Lok Adalat : लोक अदालतीत एक लाखाहून अधिक दावे निकाली; पुणे राज्यात पहिल्या स्थानी

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये सर्वाधिक प्रकरणे निकाली काढण्यात पुण्याने राज्यात आपला पहिला क्रमांक यावेळी देखील कायम ठेवला आहे.
public court
public courtsakal
Updated on

पुणे - राष्ट्रीय लोक अदालतमध्ये सर्वाधिक प्रकरणे निकाली काढण्यात पुण्याने राज्यात आपला पहिला क्रमांक यावेळी देखील कायम ठेवला आहे. शनिवारी (ता. ९) झालेल्या लोकअदालतीत एक लाख १० हजार १९२ प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले आहे. त्यातून ३९६ कोटी दोन लाख ९९ हजार २०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल झाले आहे.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी लोक अदालतीचे आयोजन केले होते. दाखव व दाखलपुर्व दावे निकाली काढण्यासाठी १३३ पॅनेल नियुक्त करण्यात आले होते. या पॅनेलची संख्या देखील राज्यात सर्वाधिक होती, अशी माहिती सचिव पाटील यांनी दिली.

३९६ कोटी रुपयांचे तडजोड शुल्क वसूल -

दाखलपूर्व स्वरूपाचे दोन लाख १६ हजार ८६ दावे लोक अदालतीत ठेवण्यात आले होते. त्यापैकी ७९ हजार ९५६ दावे निकाली काढण्यात आले. त्यातून ७६ कोटी २१ लाख ९४ हजार २५३ रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. तर ७२ हजार ४७७ प्रलंबित प्रकरणांमधून ३० हजार २३६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यात ३१९ कोटी ८१ लाख ४ हजार ९४७ रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

दाव्याचा प्रकार - निकाली दाव्यांची संख्या

- बँकेची कर्जवसुली - ३५५२

- तडजोड पात्र फौजदारी गुन्हे -२९३८५

- वीज देयक - १५७

- कामगार विवाद खटले - ७१

- भूसंपादन -१०३

- मोटार अपघात दावे न्यायाधिकरण - १४६

- वैवाहिक विवाद - २८५

- निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट - २२१२

- इतर दिवाणी - ९२४

- पाणी कर - ६८१८०

- ग्राहक विवाद - १८

- इतर - ५१८६

एकूण - १,१०,१९२

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने यंदा देखील दावे निकाली काढण्यात अग्रेसर राहण्याची परंपरा कायम राखली आहे. या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्याच्या सर्व न्यायालयातील अधिकारी-कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी, पोलिस प्रशासन, आणि नागरिकांचे चांगले सहकार्य मिळाले आहे. तर प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. लोकअदालतमध्ये तडजोड केल्यास पक्षकारांचा वेळ, पैसा वाचतो. होणाऱ्या मानसिक त्रासातून सुटका होते.

- सोनल पाटील, सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

सर्वाधिक प्रकरणे निकाली काढणारे पहिले तीन जिल्हे -

जिल्हा - ठेवलेली प्रकरणे - तडजोड शुल्क

पुणे - २,८८,५६३ - १,१०,१९२ - ३९६०२९९२००

कोल्हापूर - ९९४८० - ६०५५८ - ७५१४८४४८१

नागपूर - १४२५६२ - ५६८३१ - १४३०४०६०३२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com