esakal | सिंहगड पर्यटकांना खुला; उपद्रव शुल्कात वाढ पहिल्या दिवशी सुमारे ५०० पर्यटकांचा वर्दळ
sakal

बोलून बातमी शोधा

sinhgad fort

सिंहगड पर्यटकांना खुला; पहिल्या दिवशी सुमारे ५०० पर्यटकांचा वर्दळ

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या नवीन आदेशाने आज मंगळवारी सिंहगड सुमारे सहा महिन्यांनी पर्यटकांना खुला झाला आहे. असे असले तरी गडावर जाणाऱ्या वाहनांसाठीचे उपद्रव शुल्कात दुपटीने वाढ करण्यात आलेली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाची दुसरी लाट आल्याने प्रादुर्भाव रोखणे गरजेचे होते. म्हणून सात जुलै २०२१ रोजी सार्वजनिक तसेच गर्दीची ठिकाणे बंद केली होती. त्यानंतर पावसाळ्यात दरड, निसरडी ठिकाणे, धोकादायक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सिंहगड, खडकवासला चौपाटी पर्यटकांच्यासाठी बंद केला होता. उपमुख्यमंत्री व पालक मंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्याने मागील आठवड्यात शुक्रवारी पर्यटन ठिकाणे सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज मंगळवारी गड खुला करण्यात आला.

वन सरंक्षण समितीच्या उपद्रव शुल्क नाक्यावरील माहितीनुसार, सिंहगडावर आज मंगळवारी दिवसभरात १४० दुचाकीने २८०, तर ४३ चारचाकीने सुमारे २१५ अशी २०३ वाहने गडावर गेली होती. गड सुरू झाल्याचे माहिती नसल्याने वडापमधून सुमारे अवघे ५०- ६० असे सुमारे ५५० ते ६०० जण शिवभक्त पर्यटक सिंहगडावर पोचले होते.

उपद्रव शुल्क ५० आणि १०० रुपये

सिंहगडावर जाण्यासाठी वन विभागाच्या हद्दीतून जावे लागते. त्यामुळे, आपला वन विभागातील प्रवेश हा येथील आधीवासाला उपद्रव होतो. म्हणून सिंहगडावर जाणाऱ्या वाहनांच्याकडून उपद्रव शुल्क आकारण्यात येतो. पूर्वी दुचाकीला २०, चारचाकीला ५० रुपये आकारले जात होते. तर आता रचनेनुसार दुचाकीला ५० तर चारचाकीला १०० रुपये आकरण्यास आज पासून सुरुवात झाली.

"माझा सिंहगड, माझा अभियान या उपक्रमाला सुरवात केली आहे. गडावर येणाऱ्यांनी गडाचे पावित्र्य राखावे. गडाची अस्मिता वाढविण्यासाठी शिवभक्त, पर्यटकांनी सहकार्य करावे. सिंहगड आणि परिसराच्या विकासासाठी वन संरक्षण समितीला बळकटी द्यावी."

- राहुल पाटील, उप वनसंरक्षक पुणे

loading image
go to top