
खडकवासला : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी परकीय आक्रमणांचा प्रतिकार केला, तसेच १९४२ च्या ऑगस्ट क्रांतीत स्वातंत्र्य सैनिकांनी ‘चले जाव’चा नारा देत ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले होते. आता वनराई व शेतीसमोर परदेशी उपद्रवी गवताचा (तण) नवा शत्रू उभा आहे. स्थानिक जैवविविधतेचे नामोहरम करून पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने त्याचे निर्मूलन करणे आणि स्थानिक, उपयुक्त वनस्पतींना पुन्हा जीवनदान देण्यासाठी हे घातक तण काढण्याचा उपक्रम शनिवारी (ता. ९) सिंहगडावर सुरू झाला आहे.