संक्षिप्त

संक्षिप्त
Published on

‘एसआयआर’ची कामे
वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश
वाशीम : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाची कामे विहित मुदतीत शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दैनंदिन नियोजन करून प्रलंबित कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले. मंगरूळपीर तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी मतदान केंद्रनिहाय कामकाजाचा आढावा घेत कमी प्रगती असलेल्या केंद्रांबाबत सूचना केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी रवी काळे, तहसीलदार सुधाकर अनासुने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, नागी येथील भाग क्रमांक ३७चे बीएलओ डी. व्ही. राऊत यांनी गणना प्रपत्रांचे शंभर टक्के वितरण आणि माहितीचे संगणकीकरण पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी कुंभेजकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. राऊत यांनी नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि नागरिकांशी समन्वय साधतानाचे अनुभवही मांडले.

आंतरमहाविद्यालयीन फेन्सिंग
स्पर्धेत विनया जाधव प्रथम
बुलडाणा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन फेन्सिंग स्पर्धा-२०२६ मध्ये भाऊसाहेब फुंडकर शासकीय कृषी महाविद्यालयातील तृतीय वर्ष बी.एस्सी. (कृषी) शाखेची विद्यार्थिनी विनया बाळकृष्ण जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. नागपूर येथे झालेल्या या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची आंतरविद्यापीठीय फेन्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली असून, ती आता विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे. तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद वाकळे, संघ व्यवस्थापक डॉ. राणी जाधव तसेच सर्व प्राध्यापकांनी तिचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विनयाच्या यशामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बिलाच्या मोबदल्यात
२५ हजारांची लाच
जळगाव जामोद, जि. बुलडाणा : ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांच्या बिलाचे देयक मंजूर करून दिल्याच्या मोबदल्यात २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना विस्तार अधिकारी संदीपकुमार मोरे यांना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. तक्रारदार कंत्राटदाराने ३ जुलै रोजी एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणीत लाचेची मागणी निष्पन्न झाली. त्यानुसार बुधवारी (ता. १५) पंचायत समिती कार्यालयात सापळा रचण्यात आला. मोरे यांनी तक्रारदारास २५ हजार रुपये त्यांच्या खासगी वाहनात ठेवण्यास सांगून लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com