Pune News: बहिणीला भाऊबीजेसाठी घरी आणायला गेला, पण घरी परतलाच नाही; पेठ घाटात भावाचा मृत्यू, नुकताच विवाह अन्..

Peth Ghat Accident Claims Life of 33 Year Old Vikrant Meher: भाऊबीजेचा आनंद क्षणात विरला; बहिणीला घरी आणणाऱ्या विक्रांतचा अपघातात मृत्यू
Pune Nashik Highway Accident Young Man Dies in Peth Ghat While Returning Home With Sister for Bhau Beej Festival

Pune Nashik Highway Accident Young Man Dies in Peth Ghat While Returning Home With Sister for Bhau Beej Festival

esakal

Updated on: 

नारायणगाव : येथील पुणे -नाशिक महामार्गावर पेठ येथील घाट रस्त्यावर मोटर सायकलला अज्ञात वाहनाची मागून धडक बसून झालेल्या अपघातात भाऊबीज सणासाठी बहिणीला खेड येथून मोटर सायकलवर वारूळवाडी (ता. जुन्नर ) येथे घेऊन निघालेल्या विक्रांत गोपीनाथ मेहेर(वय 33) या भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत बहिण व भाचा हे किरकोळ जखमी झाले आहेत.ही घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...