कोरेगाव भीमा दंगलीतील आरोपींच्या अटकेसाठी "एसआयटी'

अनिल सावळे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

पुणे : कोरेगाव भीमा दंगलीतील फरारी आरोपींच्या अटकेसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी लेखी आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाकडून मंगळवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी प्रलंबित मागण्यांसाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक संदीप जाधव यांनी शिष्टमंडळाला लेखी पत्र दिल्याचे डंबाळे यांनी सांगितले.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
यावर्षी कोरेगाव भीमा येथे अभिवादनासाठी नागरिक मोठ्या संख्येने येण्याची शक्‍यता आहे. त्यांच्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी आवश्‍यक सुविधा आणि सुरक्षितता उपलब्ध करून द्यावी. त्यासाठी समन्वय समिती स्थापन करून नियोजन करताना सर्वांना विश्‍वासात घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, कोरेगाव भीमा येथील दंगलीत मंगल कांबळे यांचे घर व दुकान जाळल्याबाबत सोमवारी शिक्रापूर पोलिस ठाण्यात पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव भीमा विजयस्तंभ राष्ट्रीय स्मारक व्हावे
गतवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आंबेडकर स्मारकांच्या विकासासाठी कृती कार्यक्रमात पेरणे येथील कोरेगाव भीमा विजयस्तंभाचा समावेश करून त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. परंतु विजयस्तंभाचे राष्ट्रीय स्मारक करण्यास सरकार चालढकल करीत आहे. त्यामुळे 12 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती डंबाळे यांनी यावेळी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "SIT" for arrest of accused in Koregaon Bhima riots