chain snacher arrested
sakal
दौंड - पुणे जिल्ह्यातील चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या सोनसाखळी चोरीच्या सहा गुन्ह्यांचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. याप्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यांत वापरलेली दुचाकी, असा एकूण नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.