राज्य शासनाने केला पूरग्रस्तांसाठी सहा कोटींचा निधी मंजूर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

पुणे - दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त कुटुंबीयांना मदत देण्यासाठी विभागीय आयुक्‍त यांनी शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने सहा कोटी 44 लाख 90 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हा प्रशासनाला हा निधी प्राप्त झाल्याबरोबर बाधित कुटुंबांना तत्काळ वितरित करण्यात यावा. हा निधी ज्या हेतूसाठी वर्ग केला आहे, त्याच कारणासाठी वापरण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत मंजूर निधीपेक्षा अधिक खर्च होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच वितरित अनुदानातून जर काही रक्कम खर्ची पडणार नसेल, तर ती विहित वेळेत शासनास समर्पित करावी, अशा सूचना महसूल विभागाचे उपसचिव सु. ह. उमराणीकर यांनी दिल्या आहेत. 

बेरोजगारांसाठी खुशखबर! पुण्यात मिळणार रोजगाराची संधी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six crore funds have been approved for flood victims