विहिरीत पडून सहा वर्षीय मुलीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jijabai Dagade

विहिरीत पडून सहा वर्षीय मुलीचा मृत्यू

निरगुडसर - निरगुडसर (ता. आंबेगाव ) येथे मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या एका मेंढपाळाची ६ वर्षीय लहानगी मुलगी खेळताना पाय घसरुन ५० फूट खोल विहिरीच्या पाण्यात पडून मयत झाली असल्याची दुःखद घटना शनिवारी दि.४ रोजी घडली आहे. जिजाबाई संतोष दगडे (वय ६ वर्षे) असं विहिरीतील पाण्यात बुडून मृत झालेल्या लहान मुलीचे नाव असून मृतदेह रविवारी रात्री काढण्यात यश आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, निरगुडसर येथील बाम्हणदरा येथील जारकरवाडी ते मेंगडेवाडी मंचर रस्त्याच्या बाजूला ओढ्याच्या कडेला शेतकरी सुरेश किरवे यांच्या मालकीची विहीर आहे. शनिवारी मेढपाळ संतोष लालु दगडे यांची मेंढरे ओढ्यावरील पाणी पिण्यासाठी आली. पाणी पिल्यानंतर मेंढ्या झाडाच्या सावलीत बसल्या होत्या. मुलीचे वडील गावात गेले होते. झाडाखाली मुलीची आजी सुमनबाई लालू दगडे, मृत झालेली मुलगी जिजाबाई दगडे या दोघीच होत्या. मुलीच्या आजीला झोप लागली असल्याने मुलगी झाडाखाली खेळत असताना खेळता खेळता शेजारील विहिरीकडे गेली असता तिचा तोल गेला आणि ती ५० फूट खोल विहिरीमध्ये पडली.

सदर मुलगी नंतर मिळून न आल्याने तिचा सगळीकडे शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. या बाबत मुलगी बेपत्ता झाली असल्याची माहिती पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. सदर मुलगी विहिरीत पडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यावेळी तिला निरगुडसर येथील स्थानिक ग्रामस्थ, तरुण यांनी शोधाशोध केली असता ती सापडली नाही. त्या नंतर जुन्नर येथील आपत्कालीन व्यवस्थापन टीमला बोलवले असता रविवारी रात्री मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात त्याना यश आले आहे.

Web Title: Six Year Old Girl Dies Falling Into Well

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top