पिंपरीत १६ वाहनांची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

दुचाकीवरून आलेल्या नऊ ते दहा जणांच्या टोळक्‍याने १६ वाहनांची तोडफोड केली. ही घटना सोमवारी (ता.१३) रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपरीतील संजय गांधीनगर येथे घडली. 

पिंपरी - दुचाकीवरून आलेल्या नऊ ते दहा जणांच्या टोळक्‍याने १६ वाहनांची तोडफोड केली. ही घटना सोमवारी (ता.१३) रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपरीतील संजय गांधीनगर येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी गोरख बाबूराव देवकर (रा. संजय गांधीनगर, काळेवाडी पुलाजवळ, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दीपक कुमार राऊत (वय २३, रा. संजय गांधीनगर, काळेवाडी), अक्षय भोसले (रा. पवनानगर, काळेवाडी), अमोल खेडकर, सूरज ताथवडे, रसुल्या व अरुण (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्यासह आणखी तीन ते चार जणांवर गुन्हा दाखल आहे. 

सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नऊ ते दहा जणांचे टोळके संजय गांधीनगर परिसरात आले. ‘योगी कुठे आहे, त्याचे घर कुठे आहे, त्याला आज जिवंत सोडणार नाही’, असे म्हणत आरडाओरडा करीत या परिसरातील १६ वाहनांची दांडके, कोयता व धारदार शस्त्राच्या साहाय्याने तोडफोड केली. तसेच ‘आमच्यामध्ये कोणी आले तर जिवे मारून टाकू’, अशी धमकी देत दहशत निर्माण केली. या घटनेत दुचाकी, तीनचाकी व चारचाकीसह इतर वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sixteen vehicles todphod in Pimpri