Marathi Literature Sakal
पुणे
Marathi Literature : वयाच्या सोळाव्या वर्षी पूर्वाचा 'कस्तुरी' कादंबरीतून हुंडा प्रथेवर आघात
Kasturi Book : १६ वर्षांची पूर्वा हडवळे हिने हुंडा प्रथेविरोधात ‘कस्तुरी’ कादंबरी लिहून समाजाला जागवणारा संदेश दिला आहे.
हडपसर : हुंडा म्हणजे प्रत्येक मुलीच्या सुगंधित आयुष्यावर पडलेलं विरजणचं. त्यातून उध्वस्त होणाऱ्या हळव्या भाव-भावना आणि निर्माण होणारा मानसिक संघर्ष कायमची टोचणी लावणारा ठरतो. याच दुःखाला वाचा फोडण्यासाठी कु. पूर्वा लक्ष्मीकांत हडवळे हिने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी 'कस्तुरी' ही कादंबरी लिहून हुंडा प्रथेवर जोरदार आघात केला आहे.