पुणे मेट्रोचा सोळा वर्षांचा अविरत प्रवास..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Maha Metro

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (ता. ६) वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी ते फुगेवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे उद्घाटन होत आहे.

पुणे मेट्रोचा सोळा वर्षांचा अविरत प्रवास..!

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते रविवारी (ता. ६) वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी ते फुगेवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे (Metro Route) उद्घाटन (Inauguration) होत आहे. हा टप्पा गाठण्यासाठी जवळपास १६ वर्ष कालावधी लोटला. मेट्रोच्या आगमनाने पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडत आहे. मेट्रोचा हा केवळ पहिला टप्पा असून, येत्या डिसेंबर अखेरीस वनाज ते रामवाडी व स्वारगेट ते पिंपरी हे दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत.

हेही वाचा: स्टार्टअपने बौद्धिक मालमत्ता नियंत्रित करण्याची क्षमता निर्माण करावी - बाबा कल्याणी

अशी झाली मेट्रो प्रकल्पाची वाटचाल

 • २१ नोव्हेंबर २००६ - मेट्रो प्रकल्पासाठी स्थायी समितीकडून ‘दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’ची (डीएमआरसी) नियुक्ती

 • २८ जून २००६ - वनाज-रामवाडी मार्ग महापालिकेने मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला

 • ४ सप्टेंबर २००९ - ‘डीएमआरसी’कडून प्रकल्प अहवालाचे महापालिकेला सादरीकरण

 • २७ जानेवारी २०१० - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडून ‘डीएमआरसी’च्या प्रकल्प अहवालाला मंजुरी

 • २८ जून २०१२ - वनाज-रामवाडी मार्ग मंजुरीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठविला

 • २४ सप्टेंबर २०१२ - पिंपरी-चिंचवड-स्वारगेट मार्गाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी

 • १४ जानेवारी २०१३ - वाढलेली किंमत लक्षात घेऊन सुधारित मेट्रो अहवाल पाठविण्याचा राज्य सरकारचा पुणे आणि पिंपरी महापालिकेला आदेश

 • २४ जानेवारी २०१३ - दोन्ही महापालिकांकडून सुधारित अहवाल सादर

 • ११ फेब्रुवारी २०१४ - केंद्र सरकारकडून मेट्रो प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी

 • २६ जून २०१४ - प्री- पीआयबीसाठी (सार्वजनिक गुंतवणूक मंडळ) मेट्रो प्रस्ताव दाखल

 • ७ मार्च २०१५ - मार्गावरील आक्षेपाबाबत बापट समिती नियुक्त

 • २० एप्रिल २०१५ - बापट समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर

 • १ डिसेंबर २०१५ - बापट समितीच्या शिफारशींनुसार बदल करून राज्य सरकारने केंद्राला मेट्रो प्रस्ताव पाठविला

 • १४ नोव्हेंबर २०१६ - ‘पीआयबी’ची दिल्लीत बैठक, मेट्रो प्रकल्पाला मंजुरी, अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे सादर

 • २४ डिसेंबर २०१६ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील ३१ किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचे ऑनलाइन भूमिपूजन

 • १ जानेवारी २०१७ - मेट्रोच्या मुख्य कार्यालयाचे काम सुरू

 • ११ जुलै २०१७ - नाशिक फाटा येथे पहिल्या पिलरची पायाभरणी पूर्ण

 • २५ ऑक्टोबर २०१७ - वल्लभनगर जवळील पहिल्या पिलरचे काम पूर्ण

 • ११ मार्च २०१८ - पौड रस्त्यावर पहिले पिलरचे काम पूर्ण

 • २० मार्च २०१८ - वनाज-रामवाडी मार्गावर पहिल्या सेंगमेंटची उभारणी

 • १७ नोव्हेंबर २०१९ - भुयारी मेट्रोसाठी टनेल बोअरिंग मशिन पुण्यात

 • २५ डिसेंबर २०१९ - भुयारी मेट्रोचे काम सुरू

 • ऑगस्ट २०२० - वनाज ते रामवाडी दरम्यान एलिव्हेटेड मेट्रोच्या खांबांची उभारणी पूर्ण

 • नोव्हेंबर २०२० - वनाज-गरवारे मार्गावर गर्डरचे काम पूर्ण

 • मार्च २०२१ - लोहमार्ग टाकण्याचे काम पूर्ण

 • एप्रिल २०२१ - सिग्नलिंग, टेलिकम्युनिकेशन सिस्टीम उभारणी सुरू

 • जून २०२१ - मेट्रोच्या ११ स्थानकांची उभारणी पूर्ण

 • ३० जुलै २०२१ - मेट्रोची पाच किलोमीटरची ट्रायल रन पूर्ण

 • नोव्हेंबर २०२१ - वनाज-गरवारे दरम्यानची बहुतांश काम पूर्ण

 • ६ मार्च २०२२ - उद्घाटनासाठी ११ किलोमीटरचा मेट्रो मार्ग सज्ज

‘सकाळ’ची आग्रही भूमिका

मेट्रोतून प्रवास करण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी पुणेकरांना एका दशकापेक्षा जास्त कालावधीची वाट पहावी लागली. या प्रकल्पात अनेक अडचणीही आल्या. मात्र, पुणेकरांची भावना लक्षात घेऊन ‘सकाळ’ने मेट्रो लवकर धावली पाहिजे, यासाठी आग्रही भूमिका घेत पाठपुरावा केला. या प्रकल्पाचा आढावा घेणारी विशेष पुरवणी ‘सकाळ’ने १८ जून २०१० रोजी प्रसिद्ध केली होती. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मेट्रोची आवश्‍यकता का आहे, मेट्रोचा मार्ग कसा असेल व या प्रकल्पाचे नियोजन कसे असेल, आदींचा आढावा या पुरवणीत घेण्यात आला होता.

Web Title: Sixteen Years Of Uninterrupted Pune Metro Journey

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneMetroJourney