esakal | सकाळी सहाला अतिक्रमण निर्मूलन मोहीम
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : सकाळी सहा वाजता अतिक्रमण निर्मूलन मोहीम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरातील महत्त्‍वाचा प्रवेश मार्ग असलेल्या जुन्या पुणे-बंगळूर हायवेवरील राजाराम कॉलेजच्या भिंतीलगत असलेल्या २७ टपऱ्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सकाळी सहा वाजता हटविल्या. बऱ्याच महिन्यानंतर कडक पोलिस बंदोबस्त आणि महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताफा घेत सकाळी राबविलेल्या या मोहिमेची दिवसभर चर्चा होती.

शहरात दिसेल तिथे टपऱ्या टाकून अतिक्रमणे केली जात असल्याने अतिक्रमणाचा मोठा विळखा पडल्याचे चित्र आहे. जुन्या पुणे-बंगळूर हायवेवर राजाराम कॉलेजच्या संरक्षक भिंतीलगत काही दिवसांपासून ५० हून अधिक टपऱ्या लावल्या होत्या. सायंकाळी येथे मोठ्या प्रमाणात लोकांची ये-जा असल्याने नागरिकांची वाहने रस्त्यावरच पार्किंग केली जात होती. दुचाकी, त्यानंतर चारचाकी पार्किंग होत असल्याने जवळपास निम्मा रस्ता व्यापला जात होता. या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या जाणवत होती. अपघाताचीही शक्यता होती.

सकाळी सहा वाजता महापालिका प्रशासनाने कारवाई हाती घेतली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता बाबूराव दबडे, अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख पंडित पोवार, मुकादम रवींद्र कांबळे यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा होता. एक जेसीबी, तीन ट्रॅक्टर व दोन डंपरच्या सहाय्याने कारवाई केली. दहा फेरीवाल्यांनी हातगाड्या स्वतःहून काढून घेतल्या. बारा फेरीवाल्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून सोमवारी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईचे स्वागत होत आहे.

loading image
go to top