
Pune Traffic
Sakal
पुणे : कोरेगाव पार्क व लष्करमधील क्वीन्स गार्डन परिसराला जोडणाऱ्या साधू वासवानी पुलाचे काम ६० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. महापालिकेकडून संबंधित पुलाच्या कामाला गती दिली जात असून, मार्च २०२६ पर्यंत संबंधित पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापूर रस्ता आणि नगर रस्त्यावरील वाहनचालकांना दोन्ही रस्त्यांवर जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकणार आहे.