
सिंहगड रस्ता : सिंहगड रस्ता येथे असलेल्या उड्डाण पुलावर साचलेले पावसाचे पाणी पुलाखाली असलेल्या दुभाजकात सोडण्यात आले आहे. यामुळे दुभाजकात असलेली माती मुख्य सिंहगड रस्त्यावर वाहत आली. परिणामी सिंहगड रस्त्यावर चिखल होऊन घसरण झाली आहे. यामुळे गाड्या घसरून अपघात झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.