Siya Goyal Middle Finger Video : सिया गोयलला कसलाच पश्चाताप नाही? मधले बोट दाखवत केला इशारा; व्हिडिओ व्हायरल

Pune Lohgad Siya Goyal Video : सोशल मीडियावर सिया गोयलचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. मधले बोट दाखवल्याच्या कृतीनंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
Siya Goyal Middle Finger Video

Siya Goyal Middle Finger Video

esakal

Updated on

Siya Goyal Viral Video : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर केतन अगरवालच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याविरोधातील तपासाला वेग आला आहे. तपासाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी सिया गोयलला विविध ठिकाणी नेऊन पंचनामे केले. याचवेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झालेला तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी आज शुक्रवारी संपत असल्याने त्यांना पुढे न्यायालय कोणत्या कोठडीत पाठवते, याकडे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com