
वडगाव शेरी : मोठी रहदारी असलेल्या येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात मानवी हाडाचा सांगाडा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हे ठिकाण येरवडा पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे पोलिसांचीही चांगलीच पळापळ झाली. ही खबर मिळताच पोलिसांनी जागेवर जाऊन तो मानवी हाडांचा सांगाडा ताब्यात घेतला आणि त्यानंतर सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला.