कौशल्य विकास हाच विकासाचा मूलमंत्र - राजेश टोपे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Convocation Ceremony Pune Institute of Business Management
कौशल्य विकास हाच विकासाचा मूलमंत्र - राजेश टोपे

कौशल्य विकास हाच विकासाचा मूलमंत्र - राजेश टोपे

पुणे : जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्ञानासोबत मूल्याचीही आवश्यकता असून, कौशल्य विकास हाच भविष्यातील यशाचा आणि विकासाचा मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन आरोग्य आणि कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांनी केले.

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट संस्थेच्या ११ व्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. टोपे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र आणि पुरस्कार प्रदान करण्यात आले. आयआयएम अहमदाबादचे माजी संचालक प्रा.जहर सहा, पीआयबीएमचे अध्यक्ष रमण प्रीत, अरविंद हली, विवेक शर्मा, नागराज गरला, भास्करबाबू रामचंद्रन आदी या वेळी उपस्थित होते.

टोपे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी ज्ञानासोबत कौशल्य आत्मसात करावे. एखाद्या कल्पनेला आर्थिक मूल्य असलेल्या उत्पादन किंवा सेवेत परिवर्तित होणाऱ्या उद्योगाकडे वळावे. राज्य आणि केंद्र सरकार नवउद्योजकांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत आहे. पुण्यातही नवउद्योजकांसाठी अनुकूल वातावरण आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी जीवनात येणारी यश-अपयशाचा विचार न करता उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करावे. बुद्धीवर नियंत्रण, प्रयत्नातील सातत्य, धैर्य, आत्मविश्वास, लढण्याची प्रवृत्ती, कठोर परिश्रम आणि वेळेच्या व्यवस्थापनाने यश मिळविता येते. ‘पीआयबीएम’चे विद्यार्थी आदर्श नागरिक म्हणूनही ओळखले जावेत. या संस्थेला कौशल्य आणि डिजिटल विद्यापीठाचा दर्जा देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. ’’

Web Title: Skill Development Key To Development Rajesh Tope Convocation Ceremony Pune Institute Of Business Management

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top