
पुणे: ‘’विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर कौशल्य शिक्षण उपलब्ध करून दिल्यास त्यांना त्यांच्या भविष्यातील करिअरची दिशा ठरवण्यास मोलाची मदत होते, प्रत्यक्ष हाताने विविध प्रयोग व प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो’’ असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेचे उपशिक्षण अधिकारी दामोदर उंडे यांनी केले. श्री छत्रपती शिवाजी तंत्र माध्यमिक शाळा (टेक्निकल स्कूल) शुक्रवार पेठ आणि 'लेंड अ हँड इंडिया' या सामाजिक संस्थेच्या संयुक्त सहकार्याने आयोजित ‘समर स्कूल’ उपक्रमाच्या सांगता व प्रमाणपत्र वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.