
Vaishnavi Hagawane: वैष्णवी हगवणे प्रकरणात नाव आलेला निलेश चव्हाण हा गुन्हेगार पार्श्वभूमी असल्याचं समोर आलं आहे. पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर त्यानं पत्नीला फसवून आपल्याच बेडरुममध्ये स्पाय कॅमेरे बसवून अनेक गैरप्रकार केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळं पोलिसांनी आता निलेश चव्हाणवर देखील लक्ष केंद्रीत केल्याचं कळतं आहे.