Sat, April 1, 2023

Pune News : पोलिस चालक भरती-२०२१ साठी कौशल्य चाचणी
Published on : 22 February 2023, 4:31 pm
पुणे : शहर पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलिस चालक भरती-२०२१ च्या कौशल्य चाचणीसाठी संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पोलिस शिपाई चालक पदाच्या मैदानी चाचणीमध्ये ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी रिक्त पदाच्या १:१० या प्रमाणात वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या ८७० उमेदवारांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
पुणे शहर पोलिसांच्या www.punepolice.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या तारखेस पहाटे ५.३० वाजता सीओईपी शिवाजीनगर या ठिकाणी वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.