दुकानदार अन् ग्राहकाचा रंगलेला ‘पुणेरी सामना’

‘‘वाट्टेल त्या अपेक्षा ठेवू नका. आम्ही फक्त मकरसंक्रातीच्या दिवशीच तीळगूळ देऊन व घेऊन एक तास गोड बोलतो. इतरवेळी गोड बोलण्यास आम्ही बांधील नाही.’’ असे म्हणून ते दुसऱ्या खोलीत गेले. दुपारच्या जेवणानंतर नेहमीप्रमाणे वामकुक्षी घेऊन सायंकाळी चारच्या सुमारास ते खरेदीसाठी बाहेर पडले. चारनंतरही दुकाने उघडी असल्याचे पाहून, ‘‘अजून दोन-तीन चष्मे लावा, म्हणजे रस्त्यात कोणाला धडकणार नाही,’’
Panchnama
PanchnamaSakal
Updated on

पुण्यातील निर्बंध हटवल्याची बातमी ऐकून जनुभाऊंनी एक चमचा साखर खाऊन आनंद व्यक्त केला, तसेच एक चमचा साखर बायकोच्या हातावरही ठेवली. ‘‘या साखरेसारखेच तुम्ही आता गोड बोला,’’ बायकोनं असं म्हणताच जनुभाऊंनी मान नकारार्थी हलवली.

‘‘वाट्टेल त्या अपेक्षा ठेवू नका. आम्ही फक्त मकरसंक्रातीच्या दिवशीच तीळगूळ देऊन व घेऊन एक तास गोड बोलतो. इतरवेळी गोड बोलण्यास आम्ही बांधील नाही.’’ असे म्हणून ते दुसऱ्या खोलीत गेले. दुपारच्या जेवणानंतर नेहमीप्रमाणे वामकुक्षी घेऊन सायंकाळी चारच्या सुमारास ते खरेदीसाठी बाहेर पडले. चारनंतरही दुकाने उघडी असल्याचे पाहून, ‘‘अजून दोन-तीन चष्मे लावा, म्हणजे रस्त्यात कोणाला धडकणार नाही,’’ असे एकावर खेकसून त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर ते एका दुकानात शिरले. प्रवेशद्वारावर दोन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अंगावर स्प्रेमधून काहीतरी शिंपडले. ‘‘काय डोकं ठिकाणावर आहे का? सॅनिटायझर असं अंगावर फवारतात का? माझ्या तळहातावर द्या.’’ जनुभाऊंनी रागाने म्हटले.

‘‘अहो आजोबा, निर्बंध हटविल्यानंतरचा हा पहिलाच दिवस असल्याने आम्ही ग्राहकांचे स्वागत अत्तर व गुलाबपाणी फवारून करतोय.’’ कर्मचाऱ्याने उत्तर दिले. ‘‘मग तशी पाटी लावता येत नाही का? माझा गैरसमज झाला ना?’’, असे म्हणून जनुभाऊ आतमध्ये गेले. ‘‘सर, काय हवंय’’, असे म्हणून तीन-चार सेल्समन धावले. थोडी खरेदी करून ते तेथून बाहेर पडले. त्यानंतर ते दुसऱ्या एका दुकानात शिरले.

‘‘दणकट पायजमा बघू’’ जनुभाऊंनी म्हटले. त्यावर दुकानदाराने पायजमा त्यांच्यासमोर ठेवला. ‘‘हा कसला आलाय दणकट पायजमा? हातांनी ओढला तरी टराटरा फाटेल,’’ जनुभाऊंनी कुत्सितपणे म्हटले. ‘‘हा दणकट पायजमा, दणकट माणसांनाच शोभून दिसेल. कोणा येरा-गबाळ्याला नाही. नुसत्या हाडाच्या सापळ्याने हा पायजमा घातल्यास घरात भूत फिरल्यासारखे वाटेल.’’ दुकानदाराने पलटवार केला.

Panchnama
पुणे : अपहाराच्या पैशातून बांधला बंगला

‘‘राहिला प्रश्न टिकाऊपणाचा. तर आजोबा, तुम्ही ‘वर’ गेलात तरी पुढची पंधरा-वीस वर्षे या पायजम्याला काही होणार नाही. तुमच्यानंतर तुमचा मुलगा व नातूही तो वापरू शकेल इतका तो दणकट आहे,’’ दुकानदाराने असं ‘समजावून’ सांगितल्यावर जनुभाऊ रागावले. ‘‘आमच्या मरणाची वाट पाहू नका. तुमचं दुकान बंद पडून वीस-पंचवीस वर्षे झाल्यानंतर आम्ही जायचा विचार करू’’. जनुभाऊंनी म्हटले. ‘‘बरं अजून काय काय आहे दुकानात?’’ ‘‘कांदा, बटाटा, वांगी, मटण, चिकन, मासे. तुम्हाला काय देऊ?’’ दुकानदाराने विचारले. ‘‘तुम्ही काय माझी चेष्टा चालवली काय,’’ जनुभाऊंनी विचारले. ‘‘आजोबा, सुरुवात तुम्ही केलीय. कपड्याच्या दुकानात येऊन, अजून काय काय असं विचारताय म्हणून आमचं जशास तसं उत्तर.’’ त्यावर जनुभाऊ थोडे नरमले व ते म्हणाले, ‘‘हातरुमाल दाखवा.’’

Panchnama
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी कायम; पुणेकर वैतागले

‘‘तुमच्या केसांसारखे की स्वभावासारखे दाखवू’’ दुकानदाराने विचारले. त्यावर जनुभाऊंनी प्रश्नार्थक चेहरा केला. ‘‘अहो, तुमच्या केसांसारखे म्हणजे शुभ्र पांढरे. स्वभावासारखे म्हणजे गुलछबू! रंगीबेरंगी दाखवू.’’ दुकानदाराने स्पष्टीकरण केलं. त्यानंतर जनुभाऊंनी एक रुमाल पसंत केला व पाचशेची नोट दुकानदारासमोर धरली. ‘‘सुटे वीस रुपये द्या. पाचशेची नोट दाखवून आमच्यावर रुबाब दाखवू नका. पाचशेचं बंडल आमच्याही गल्ल्यात आहे. दुकान खरेदी केल्याचा आव आणू नका. सुटे पैसे नसतील तर निमूटपणे निघा.’’ दुकानदाराने एवढं सुनावल्यावर जनुभाऊंचा चेहरा प्रफुल्लित झाला. पुण्यात सगळं काही सुरळीत सुरू असल्याचं पाहून त्यांनी खुशीतच शीळ वाजवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

A road blockade protest will be held at Alephata on August 9, demanding the Pune–Nashik direct railway line. Organisers have appealed to citizens to join the movement, calling it a public agitation beyond party politics.
An Amazon goods container overturned into a roadside ditch on the Pune–Nashik Highway near Narayangaon after the driver reportedly dozed off. The driver sustained minor injuries, while the vehicle and goods suffered major damage.
Union Tourism Minister Gajendra Singh Shekhawat visited Bhimashankar Temple with his family, reviewed the ongoing development works, and expressed satisfaction. He also said he would discuss extending darshan timings with the Pune District Collector for the convenience of devotees.
Despite the Maharashtra government's decision to increase the Pink E-Auto subsidy to 40%, only 17 women have started operations in Pune over the last two years, highlighting implementation challenges.
Marathi News Esakal
www.esakal.com