esakal | मैत्री दिनाला जागले अन् अडचणीत आले
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

मैत्री दिनाला जागले अन् अडचणीत आले

sakal_logo
By
सु. ल. खुटवड

आखाडातील रविवारीच मैत्री दिन आल्याने साजूक तुपातील मटण बिर्याणीबरोबरच सुके प्रॉन्स फ्री मिळाल्यानंतर जो आनंद होतो, तसा आनंद साहिलला झाला. त्याने लगेच जितू व दीपकला फोन केला. ‘आज मैत्री दिन व आखाड एकत्रित साजरा करू. पाच-सहा तास मस्त मैफल रंगव. स्थळ मात्र थोड्या वेळाने कळवतो.’’ असा निरोप दिला. थोडावेळ त्याचा विचारात गेला. मग त्याने बायकोला आवाज दिला. ‘‘अगं बरेच दिवस झाले, तू हडपसरला माहेरी गेली नाहीस. बाबांच्या वाढदिवसालाही तू फोनवरून शुभेच्छा दिल्यास हे बरे नाही. त्यामुळे आज माहेरी जा. मस्त मजा कर. मी ‘ओला’ बुक करतो.’’ साहिल असं बोलल्यावर माधवीला आश्चर्य वाटलं. ‘‘तुमच्या मनात खरं काय आहे ते सांगा.

मी गेल्यावर मित्रांना बोलावून धुडगूस घालायचा विचार नाही ना? खबरदार ! दारूच्या थेंबालाही स्पर्श केला तर.’ माधवीने चांगलाच दम भरला. ‘काहीतरीच काय! नॉनव्हेज व दारूच्या थेंबालाही मी स्पर्श करणार नाही. अगदी तुझ्या गळ्याची शपथ!’ साहिलने म्हटलं. ‘बघा हं. नाहीतर माझ्याशी गाठ आहे.’ असं म्हणून तिने बॅग आवरली. दरम्यान, साहिलनेही टॅक्सी मागवली. ‘चांगली आठवडाभर राहिलीस तरी चालेल. माझी काळजी करू नको. स्वत:ची काळजी घे,’’ असं म्हणत साहिलने माधवीला निरोप दिला. आणि लगेचच साहिलने धडाधड मित्रांना फोन करत, ‘मालपाण्या’सह आपल्या घरी बोलावले. आता असली सुवर्णसंधी कोण सोडतंय? फक्त अर्ध्या तासात सगळे मित्रमंडळ साहिलच्या घरी जमा झाले. बऱ्याच महिन्यांनी ओली पार्टी होत असल्याने सगळ्यांना लगेच झिंग चढली. त्यात दोन-तीन तास कसे गेले ते कोणालाच कळले नाही.

तेवढ्यात बेल वाजल्याने डिस्टर्ब झालं म्हणून अनेकांची सटकली. मात्र, दिलीपने आयव्होलमधून पाहिल्यानंतर त्य‍ाची बोबडीच वळली. ‘अरे! माधवी वहिनी परत आल्यात.’ त्याने असं म्हटल्यावर सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. ‘‘कोण आलंय? माझी बायकोच ना? मी घाबरत नाही तिला. मी वाघ आहे वाघ.’ असं साहिल बोलू लागल्याने त्याला चांगलीच चढली आहे, याचा अंदाज इतर‍ांना आला. मात्र, इतरांनी लगेच त्याला गप्प केलं व बेडरूममध्ये नेऊन झोपवलं. माधवी वहिनी आत आल्यानंतर, ‘वहिनी साहिलला हार्टअटॅक आला आहे. त्यामुळे आम्ही सगळे मित्र आलो होतो. तुम्हाला आम्ही खूप फोन केले. मात्र, तुमचा फोन लागला नाही. आता त्याची तब्येत चांगली आहे. मात्र, त्याला दवाखान्यात न्यावे लागणार आहे. आम्ही अॅम्बुलन्स बोलावली आहे. तुम्ही काळजी करू नका.’ असे म्हणून तीन-चार जणांनी साहिलला खुर्चीसकट उचलले व खाली पार्किंगमध्ये आणले. दीपकने त्याची गाडी काढली व सर्वजण साहिलला एका हॉटेलवर घेऊन आले. त्यावेळी गलबललेल्या आवाजात साहिल म्हणाला, ‘यार! खरंच तुम्ही माझे जिवलग मित्र आहात. मैत्री दिनाला तुम्ही खरं जागलात. नाहीतर माझे आज काही खरे नव्हते.’ असे म्हणून साहिलने हात जोडून सगळ्यांचे आभार मानले. तेवढ्यात दीपक जोरात किंचाळला, ‘अरे किचन ओट्यावर दम बिर्याणीचं पार्सल व दोन खंबे तसेच राहिलेत.’ त्याचं हे बोलणं ऐकून स‍ाहिलल‍ा खरंच ह्रदयविकार‍ाचा झटका आला.

loading image
go to top