संशयाचं भूत; नको तिथं सूत!

कडक संचारबंदीमुळे गेल्या काही दिवसांपासून दीपक घरीच आहे. गेल्या लॉकडाउनमध्ये रस्त्यावर विनाकारण हिंडताना दिसल्यानंतर पोलिस दोन-चार फटके टाकून विषय बंद करायचे.
Lockdown
LockdownSakal

कडक संचारबंदीमुळे गेल्या काही दिवसांपासून दीपक घरीच आहे. गेल्या लॉकडाउनमध्ये रस्त्यावर विनाकारण हिंडताना दिसल्यानंतर पोलिस दोन-चार फटके टाकून विषय बंद करायचे; पण आता पोलिस अडवतात आणि गाडी तरी जप्त करतात किंवा चार-पाच तास थांबून ठेवतात. त्यामुळे इतका वेळ बाहेर कोठे होता, म्हणून मानसी संशय घ्यायची. कोणाला भेटायला गेला होतात? कोण आहे ती? या तिच्या प्रश्‍नांच्या सरबत्तीपुढे दीपक हतबल व्हायचा. एकदा दीपक सहजच बाहेर पडला. मार्केट यार्डजवळ त्याला पोलसांनी अडवले. त्याची चौकशी केली. त्यावेळी तो विनाकारण बाहेर पडल्याचे उघड झाले. मग पोलिसांनी त्याला थांबून ठेवले. यावेळी मानसीने पाच-सहा वेळा फोन केले. ‘आलोच पाच मिनिटांत, आलोच दहा मिनिटांत’ असे त्याचे चालले होते. नंतर नंतर त्याने फोन घेणेही बंद केले. तीन तासांनंतर वैतागून तो घरी आला. ‘कोठे गेला होता इतका वेळ? कोणाशी गुलुगुलू बोलण्यात गुंतला होता?’ या तिच्या प्रश्‍नाने तो संतापला. ‘हो! गेलो होतो मी माझ्या लैलाला भेटायला. जा तुला काय करायचे ते कर.’ असे म्हणून त्याने बेडरूमचे दार धाडकन लावले.

Lockdown
पुण्यात रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणारा फार्मासिस्ट गजाआड; प्रिस्क्रीप्शन चोरुन मिळवायचा इंजेक्शन

मार्केट यार्डजवळ मात्र वेगळाच घोळ झाला होता. बऱ्याच गाड्या एकाच ठिकाणी लावल्याने दीपकने आपली गाडी समजून, दुसऱ्याच गाडीला चावी लावली होती व नेमकी ती बसली होती. त्यामुळे तीच गाडी घेऊन तो घरी आला होता. गाडीची मूळ मालकीण लीलाने पोलिसांच्या नोंद वहीवरून दीपकला फोन केला.

मोबाईल हॉलमध्येच राहिला असल्याने मानसीने तो घेतला. ‘अहो दीपकराव, मी लीला बोलतेय. मघाशी घाईगडबडीत माझी ॲक्टिव्हा चुकून तुम्ही घेऊन गेला आहात. त्यामुळे नाईलाजाने तुमची ॲक्टिव्हा मी घेऊन आले आहे. गाडी लवकर एक्सचेंज करा.’ लीलाने म्हटले.

‘क्काय! लैला? दुसऱ्याच्या संसारात बिब्बा घालताना तुला लाज लज्जा वाटत नाही का? पण तुझ्याकडे मी नंतर बघते. आधी माझ्या नवऱ्याला चांगला धडा शिकवते.’ असे म्हणून मानसीने मोबाईल बंद केला आणि बेडरूमच्या दाराला जोरजोरात धडका मारायला लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com