झोपेच्या गोळ्यांची विक्री नशेसाठी; अन्न आणि औषध विभागाची पुण्यात कारवाई

Sleeping pills were sold as drugs Fad Administration action on medical store at wagholi
Sleeping pills were sold as drugs Fad Administration action on medical store at wagholi

पुणे : डॉक्टरांच्या सल्ल्या नंतरच झोपेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाच्या गोळ्यांचा वापर नशेसाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील वाघोली परिसरात असलेल्या एका मेडिकल वर अन्न आणि ओैषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे.

दरम्यान या कारवाईदरम्यान या दुकानातून सहा हजार गोळ्या जप्त केल्या असून ओैषध विक्रेत्याच्या विरोधात लोणी कंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alprax नावाची गोळी झोपेसाठी वापरली जाते, दरम्यान या औषधाचा वापर नशेसाठी केला जात आहे. या प्रकरणी वाघोली येथील साई अरिहंत जेनरिकचे महावीर महावीर देसरडा यांच्या विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी या औषधाच्या ६ हजार गोळ्यांची अज्ञातांना विक्री केल्याचे आढळून आले आहे. तसेच बीडमधील एका मेडिकलच्या नावे बनावट बिले देखील त्याने तयार केली आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Sleeping pills were sold as drugs Fad Administration action on medical store at wagholi
महाराष्ट्रात मतदार ओळखपत्र होणार आधारशी लिंक; एक ऑगस्टपासून प्रक्रिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com