पुणे - बोपोडी येथील झोपड्या अखेर जमीनदोस्त

बाबा तारे
शनिवार, 30 जून 2018

औंध (पुणे) : प्रभाग क्रमांक आठ मधील बोपोडी येथील हॅरीस पुलाजवळ असलेल्या गांधीनगर झोपडपट्टीतील रहिवाशांनी घरे रिकामे करुन दिल्यानंतर अखेर आज पालिकेच्या वतीने ही घरे जमिनदोस्त करण्यात आली.

पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाला जोडणा-या हॅरीस पुलाजवळ नवीन पुल बांधण्याचे काम करण्यात येत आहे.परंतु या पुलाला ही झोपडपट्टी अडथळा ठरत असल्याचे पालिकेच्या वतीने ही घरे खाली करुन आज जमिनदोस्त करण्यात आली.पुणे व पिंपरी मनपाच्या वतीने करण्यात येणा-या या पुलाच्या कामास झोपडपट्टीमुळे अडचणी येत होत्या त्यामुळे ही हटवणे आवश्यक असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले होते.

गांधीनगर परिसरातील ही घरे पाडल्यानंतर आता या पुलाच्या कामास गती मिळणार असून वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.आता जागेच्या ताब्यासंदर्भातील प्रक्रिया चालू झाली असून पिंपरी चिंचवड मनपालाही याबाबत कळवण्यात आले आहे. सर्व कार्यवाही ही सुरळीत व सरक्षीत झाली असून यासाठी सर्वांनीच सहकार्य केल्याचे  पालिकेच्या औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त संदिप कदम यांनी सांगितले.

Web Title: slums are destroy in bopodi