esakal | खराडी येथील दर्ग्यात आढळले लहान बाळ; दामिनी पथकाने दिली मायेची ऊब
sakal

बोलून बातमी शोधा

A small baby found in the Dargah at Kharadi

खराडी येथे दर्ग्यातील मागच्या बाजूला अज्ञात इसम या मुलीला सोडून गेला. सायंकाळी पाच वाजण्याची वेळ असल्यामुळे दर्गाची देखभाल ठेवणारे व्यवस्थापक पुढच्या बाजूला सफाई करत होते. त्याच वेळेस एक तरुण बाळाला घेऊन दर्ग्यात आला. आणि दर्ग्याच्या मागील बाजूला कोणी नाही हे पाहून बाळाला सोडून गेला.

खराडी येथील दर्ग्यात आढळले लहान बाळ; दामिनी पथकाने दिली मायेची ऊब

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वडगाव शेरी : नगर रस्त्यावरील खराडी येथील दर्ग्यात आज सायंकाळी तीन महिन्याची एक गोंडस चिमुरडी आढळून आली. या गोंडस लेकराला निष्ठूरपणे सोडून जाणाऱ्या अज्ञात इसमा विरुद्ध चंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथे दर्ग्यातील मागच्या बाजूला अज्ञात इसम या मुलीला सोडून गेला. सायंकाळी पाच वाजण्याची वेळ असल्यामुळे दर्गाची देखभाल ठेवणारे व्यवस्थापक पुढच्या बाजूला सफाई करत होते. त्याच वेळेस एक तरुण बाळाला घेऊन दर्ग्यात आला. आणि दर्ग्याच्या मागील बाजूला कोणी नाही हे पाहून बाळाला सोडून गेला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिमुरडीचा रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर दर्गा व्यवस्थपकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर चंदननगर पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. पोलीस ठाण्याच्या महिला अधिकारी उपनिरीक्षक संगीता काळे, दामिनी पथक व मार्शलच्या कर्मचाऱ्यांनी जागेवर येऊन लहान मुलीला सोबत घेतले. मायेची उब मिळताच ती चिमुरडी रडण्याची थांबली. पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यानंतर सदर मुलीची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर बालकल्याण समितीशी संपर्क साधण्यात आला. समिती अध्यक्षांनी फोनवरून दिलेल्या आदेशानुसार शिशुगृहात मुलीला पाठवण्यात आले. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 

पुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा