कोरोनामुळे श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर बंद ; व्यावसायिक झाले बेरोजगार 

the business becomes unemployed Due to the closure of Shri Kshetra Bhimashankar Temple due to Corona outbreak
the business becomes unemployed Due to the closure of Shri Kshetra Bhimashankar Temple due to Corona outbreak

शिनोली : कोरोना विषाणुच्या महामारीमुळे बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे असणारे श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर बंद आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये श्रावण महिन्यातही बंद राहणार असल्याने येथील व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले शासनाने मदत करावी अशी मागणी येथील व्यासायिक करीत आहेत. कोरोना महामारी आंबेगाव तालुक्याचा हॉटेल व्यवसायावर आदळली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्री क्षेत्र भीमाशंकरला देशाच्या कानाकोपऱ्यातून वर्षभर हजारो भाविक व पर्यटक येत असतात. विशेषत: महाशिवरात्र व श्रावण महिन्यात उच्चांकी गर्दी असते. या भाविक व पर्यटकांवर येथील सुमारे 175 व्यावसायाकांचा व्यापार चालु असतो. यामध्ये हॉटेल, लॉजिंग, देवाचे बेलफुल नारळ, प्रसिध्द कंदी पेढे, कटलरी, वनऔषध, पावसाळ्यात प्लॅस्टीक कागद, रानमेवा, रानभाज्या व्यावसाय करणाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मंचर ते भीमाशंकर या 68 किलोमीटर अंतरावरील सर्व हॉटेल व्यावसाय बंद पडले आहेत. शासकीय नियमांची नियमावली व मंदी आदि कारणांमुळे हॉटेल्स ओस पडले आहेत. यातच लाखो रूपयांची गुंतवणूक केलेले व्यावसायिक 
मेटाकुटीला आले आहेत. 

अरे देवा! पुणे महापालिकेचा आरोग्य विभागच पडला आजारी

तालुक्यात हॉटेल व्यवसायावर अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. यामध्ये काही व्यावसायिक बाहेरगावचे आहेत. त्यांना शेती व इतर उत्पन्नाचा आधार नाही. त्यामुळे त्यांची स्थिती बिकट झाली आहे. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांची रोजीरोटी याच व्यवसायावर चालत आहे. तेही बेरोजगारीच्या वाटेवर आहेत. सर्व हॉटेल व्यावसायिकांची महिन्याकाठची उलाढाल लाखोच्या घरात आहे. मात्र, कारोनाच्या महामारीत हॉटेल व्यवसायाची भट्टी पेटली गेली नाही. बहुतेक हॉटेल चालकांना हॉटेलच्या जागांचे भाडे भरणेही अवघड झाले आहे. कर्मचारी निघून गेल्याने व्यवसाय सुरू करण्याचे आव्हान उभे आहे. व्यवसाय बंदअसताना कामगारांना सांभाळणे मुश्किल झाले 

स्वतःला सावरत, धीर देत त्यांनी केली आत्मविश्‍सासाने कोरोनावर मात

''शासनाने सध्या हॉटेल चालकांना काही नियमांसहित व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, ग्राहकच नसल्याने मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर श्रावण महिन्यातही पुर्णपणे बंद असल्याने येथील व्यावसायिक अडचणीत सापडले आहे.''असे येथील हॉटेल व बेलफुल व्यावसायिक निसार इनामदार यांनी सांगितले
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com