लघुउद्योजग म्हणातायेत, ''कोरोनापेक्षा आम्हाला जास्त भीती पैशाची''

Small Businessman are Fear of bankrupt than corona
Small Businessman are Fear of bankrupt than corona

पुणे : देशात कोरोनाने धुमाकूळ घातल्यामुळे अनेक लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. काहींना आपला जीवही गमवावा लागला. त्याचबरोबर औद्योगिक, सेवा, कृषी क्षेत्रांना आर्थिक फटका बसला आहे. अनेक लोक बेरोजगार झाले. गेले तीन महिने सर्व ठप्प मग करायचं काय?? अनेक कामगार वर्ग, छोटे व्यवसाय करणारे, दिवळखोरीच्या वाटेवर आहेत. नांदेडमधील एक तरुण पुण्यात चहाची टपरी टाकून जगणारा मारुती  वारकड म्हणतोय, ''मला कोरोनापेक्षा अर्थकारणाची मोठी भीती वाटत आहे.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

''कोरोना येईल आणि जाईल पण, त्यामध्ये बसलेला आर्थिक फटका वर्षानुवर्षे आम्हाला सोसावा लागेल. माझ्या सारखेच अनेक लोकांनी कर्ज काढून उद्योग व्यवसाय सुरु केले आहेत. देशातील लोकडाऊनमुळे तीन महिने आम्हाला काहीच करता आले नाही. जेवढे पैसे खिशात होते तेवढे  या तीन  महिन्यात खर्चून गेले आहेत, मग यापुढे करायचं काय असा प्रश्न आमच्या सोबत उभा राहिला आहे'', अशी व्यथा 'मारुती'याने 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

'या' सरकारने लावले १ लाख ४० हजार चिनी सीसीटीव्ही कॅमेरे; समोर आला नवा वाद

त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक करणारे मंगेश जाधव यांनी व्यथा मांडताना, ''मी सध्या हॉटेल व्यवसाय सोडला आहे. त्यामुळे हॉटेलची जागा ही सोडली आहे. मालकाला भाडे कोठून देणार. हॉटेल व्यवसाय तेजीत येण्यास बराच काळ जाईल, म्हणून आत्ता मी कमी पैशात एखादा व्यवसाय उभारण्याच्या प्रयत्नात आहे. घरी बसून चालणार नाही''असे मत व्यक्त केले .

चिंताजनक ! कोरोनाग्रस्तांची संख्या ६ लाखांच्या वर

पुणे शहरात गेल्या काही दिवसापासून अनेक छोट मोठे व्यवसाय बंद आहेत. काही चालू केले असतील तर, त्यांना ग्राहक नाहीत. त्या जागेच भाडे चालू असल्यामुळे ही अर्थकारणाची घडी बसवायची कशी याचीच चिंता आम्हाला लागून राहिली आहे. सुरवातीला वाटले काही दिवसात ही परिस्थिती निघून जाईल. पैसे कमवणे यापेक्षा कोरोनामुळे जीव वाचविणे महत्वाचे आहे. पण, जस-जसे दिवस जात आहेत तशी कोरोना पेक्षाही आम्हाला भीती दिवाळखोरीत निघण्याची आहे, असे मत लघु व्यवसायिकांनी व्यक्त केले.

जरी देशात आणि राज्यात लोकडॉऊन शिथिल होत असले तरी, आणखी परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे हे लघु उद्योग व्यवसाय धारक या परिस्थितीला कसे तोंड देणार हा चिंतेचा विषय बनला आहे. यातूनच कोरोनाची भीती बाळगून घरात बसण्यापेक्षा बाहेर पडून काम करणे महत्त्वाचे आहे. अशी मानसिकता या व्यवसायिकांची बनली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com