esakal | छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरेल, मोठ्या आव्हानांचा विघ्नहर्ता
sakal

बोलून बातमी शोधा

small ganesh idols may bless everyone

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आदी प्रमुख शहरांमध्ये दरवर्षी किमान हजारावर सार्वजनिक गणेश मंडळे मोठ्या गणेश मूर्तींसाठी स्थानिक प्रशासनाकडे परवानगीची मागणी करतात.

छोट्या आकाराचा सुखकर्ता ठरेल, मोठ्या आव्हानांचा विघ्नहर्ता

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करतानाच श्रीगणेशाची मूर्ती छोटी असण्यासंबंधीच्या शासनाच्या सूचनेला शास्त्राचा आधार असल्याचे श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखातून निदर्शनास आले आहे. दर वर्षी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळांचा कल मोठ्या मूर्ती आणि सजावटीवर मोठा खर्च करण्याकडे असतो. कोरोनाच्या उद्रेकामुळे जारी झालेल्या शासनाच्या निर्देशांमुळे या भपक्यावर नियंत्रण येणार आहे.

काय आहेत महाराष्ट्र सरकारच्या सूचना? डाऊनलोड करा सरकारचा निर्णय.

परंतु, शास्त्रातील उल्लेखांप्रमाणे गणेशोत्सव जितका साधा, तितका चांगला, या गोष्टीचा अनुभव सर्वांना मिळणार असल्याचे मत डॉ. तांबे यांनी लेखात व्यक्त केले आहे.

अंगुष्ठपर्वादारभ्य वितस्तिं यावदेवतु ।
गृहेषु प्रतिमा कार्या नाधिका शस्यते बुधैः॥

अंगठ्याच्या पेरापासून एक वीत म्हणजे साधारणतः नऊ इंच उंचीची एवढीच गणपतीची मूर्ती असावी, असे ऋषीमुनींचे वचन आहे, असे डॉ. तांबे यांनी त्यांच्या लेखात मांडले आहे. 

श्रीगणेशाच्या मूर्तीचा आकार किती हवा, याबद्दल प्राचीन भारतातील ऋषीमुनींनी नोंदवून ठेवलेले संदर्भ काय आहेत आणि त्याचा नेमका अर्थ काय...? गणपती अथवा श्रीगणेश असेच नामोच्चारण का करावे आणि नुसते बाप्पा का म्हणू नये...? श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी उलगडून दाखवलेला गुढार्थ.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आदी प्रमुख शहरांमध्ये दरवर्षी किमान हजारावर सार्वजनिक गणेश मंडळे मोठ्या गणेश मूर्तींसाठी स्थानिक प्रशासनाकडे परवानगीची मागणी करतात. पुण्यासारख्या शहरात सुमारे पाच लाख गणेश मूर्तींची घरगुती स्वरुपात प्रतिष्ठापना केली जाते, असे महापालिका प्रशासन सांगते. बहुतांश मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून बनविलेल्या असल्याने आणि मोठ्या मूर्तींची संख्या वर्षानुवर्षे वाढत असल्याने विसर्जनाचा मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे. रासायिनक पदार्थांनी बनविलेल्या मुर्तींमुळे पाण्याचे साठे प्रदुषित होत असल्याचे अभ्यास प्रसिद्ध झाले आहेत. 

यंदा कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर, 'पुन्हा एकदा गणेशोत्सव मूळ कल्पनेनुसार व्हावा असे सांगण्याचा श्रीगणेशांनी निर्धार केला असे वाटते. यासाठी त्यांना हातात काठी घ्यावी लागली. यावरून तरी आता लक्षात घ्यायला हरकत नाही, की पुन्हा या उत्सवात भडकपणा व भंपकपणा, भ्रष्टपणा वाढवला जाऊ नये. उत्सव ही मनुष्याच्या उत्क्रांतीची प्रक्रिया आहे, समाजामध्ये ज्ञान पसरविण्याची व सर्वांना एकत्र करण्याचा योग आणण्याची प्रक्रिया आहे,' असे डॉ. तांबे यांचे म्हणणे आहे. 

गणपतीला नैवैद्य दाखवू...हातवळणीच्या लुसलुशीत...उकडीच्या मोदकाचा..!

सेवनमंत्रा आणि तनिष्का व्यासपीठाचा उपक्रम, "रेडी टू कुक" घरपोच उकडीचे मोदक दर्जेदार घटक पदार्थ, स्वच्छ वातावरणात तयार केलेले. सुगरणींनी निगुतीने वळलेले आणि मुख्य म्हणजे बाप्पाला प्रसाद दाखवायच्याआधी वेळेत घरात पोहचतील.

तुम्ही फक्त इतकं करायचं...

  • मोदकाचं पार्सल मिळाल्यानंतर लगेच डीप फ्रीजरमध्ये ठेवायचं.
  • नैवैद्य दाखवायच्याआधी अर्धा तास फ्रीजरमधून पाहिजे तेवढेच मोदक बाहेर काढा.
  • पंधरा मिनिटांनंतर कुकरमध्ये किंवा मोदक पात्रात ते वाफवून घ्या.
  • साधारण १५ ते १८ मिनिटांनी वाफाळलेले मोदक, तुपाच्या धारेसह प्रसाद म्हणून ठेवा !

आत्ताच ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

https://sevenmantras.com/ukadiche-modak-sm-umdk.html