हुशार, चपळ अन् गुन्हेगारांचा माग काढण्यात तरबेज 'सिबा'

जनार्दन दांडगे
Thursday, 3 December 2020


गुन्हेगारचा माग काढण्यात पटाईत असलेल्या 'सिबा' श्वानाचे कारनामे सुरु, तीन महिन्यात अनेक गंभीर गुन्हांची उकल करण्यात जिल्हा (ग्रामीण) पोलिसांना मदत.

लोणी काळभोर (पुणे)- गुन्हेगार गुन्हा करताना काहीतरी पुरावा मागे सोडतो आणि तोच धागा पकडून पोलिसांची पथके गुन्हेगारापर्यंत पोहचतात. मात्र, घटनास्थळावरील पुरावा ते आरोपीचा माग या तपासादरम्यान पोलीस दलातील श्वान महत्त्वाची भूमिका बजावत असतो. असेच एक सिबा नावाची हुशार श्वान जिल्हा ग्रामीण पोलिस दलात दाखल झाली आहे. सिबाने मागील तीन महिन्याच्या कालावधीत घडलेल्या अनेक गंभीर गुन्हातील गुन्हेगारांना शोधून काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
                                
'कर्जफेड न करणाऱ्या थकबाकीदारांची नावे उघड करण्यास युनियन बँकेचा नकार'
 

अंत्यत हुशार, चपळ अन् गुन्हेगराचा माग काढण्यात तरबेज असलेली सिबा ही डॉबरमन जातीची असू 1 वर्ष 8 महिने वयाची आहे. तब्बल एक वर्षाच्या कठीण प्रशिक्षनानंतर, तीन महिण्यापूर्वी जिल्हा (ग्रामीण) पोलीसाच्या श्वान पथकात दाखल झाली आहे. दाखल झाल्यापासून मागील तीन महिन्याच्या कालावधीत सिबाने अनेक गंभीर गुन्ह्यात गुन्हेगारांचा माग काढण्यात पोलिसांना महत्त्वाची मदत केली असल्याची माहिती सिबाचे हँडलर, गणेश फापाळे यांनी दिली आहे.                                               
याबाबत अधिक माहिती देतांना गणेश फापाळे म्हणाले, ''सिबाचा जन्म 5 जानेवारी 2019 ला झालेला आहे. सिबा 45 दिवसाचे पिल्लु असताना, तिला जिल्हा पोलिस दलात पोलीस दलात आणले होते. तीचे सहा महिने संगोपन केल्यानंतर, सिबाला पुढील प्रशिक्षणासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या शिवाजीनगर येथील श्वानप्रशिक्षण केंद्रांत पाठवण्यात आले होते. शिवाजीनगर येथील केंद्रातील प्रशिक्षण काळात झालेल्या प्रत्येक परीक्षेत सिबाने चुणूक दाखवली होती. त्यानंतर तीन महिन्यापूर्वी झालेल्या अंतिम परीक्षेत चांगले गुण मिळाल्यापासून, जिल्हा (ग्रामीण) पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील श्वान पथकात काम करत आहे. 

 

पुणे पदवीधर मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; जादुई आकडा गाठण्यासाठी चुरस​

सिबाने तीन महिण्याच्या काळात केलेल्या प्रमुख कामगिरीबद्दल बोलतांना गणेश फापाळे म्हणाले, ''हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका खुनाच्या ठिकाणी सापडलेल्या चप्पलच्या वासावरुन, सिबाने आरोपीचा माग काढत आरोपाचे घर पोलिसांना दाखवले. तर भिगवण येथील एका गुन्ह्यात सापडलेल्या छोट्याशा कापडयाच्या फडक्यावरून फिर्यादीच्या बॅगा व मोबाईल शोधून काढले. या व्यतिरिक्त सिबाने आनखी कांही गंभईर गुन्हात पोलिसांना मदत केलेली आहे. 

 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart and fast Shiba helping pune District Police to track criminal