

Celebrate International Smile Day 2026 by Sharing Your Smiling Photo and Become Part of Sakal Media Groups Happiness Campaign
sakal
एखादा भन्नाट जोक ऐकून शेवटचं कधी पोट धरून हसलात? मित्रांच्या ग्रुपमध्ये गप्पा मारताना टेन्शन विसरून खळखळून कधी हसला होतात? आठवत नसेल तर आज हसण्याची संधी आहे! कारण आज (१ नोव्हेंबर) आहे ‘स्माइल डे’! आजच्या दिवशी ना कसली स्पर्धा, ना कसली धावपळ... फक्त हसायचं आणि आपलं हसू सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं! ‘एपी ग्लोबल’ आणि ‘सकाळ माध्यम समूहा’ने यासाठी खास प्लॅन केला आहे. तुम्ही कुठेही असा, फक्त एक छानसा हसरा फोटो शेअर करा आणि या आनंदाच्या उपक्रमाचा भाग व्हा.