Snake Bite | सर्पदंश उपचार प्रशिक्षण व संशोधन केंद्र जुन्नर येथे; आरोग्य मंत्री टोपे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्पदंश उपचार प्रशिक्षण व संशोधन केंद्र जुन्नर येथे; आरोग्य मंत्री  टोपे

सर्पदंश उपचार प्रशिक्षण व संशोधन केंद्र जुन्नर येथे; आरोग्य मंत्री टोपे

sakal_logo
By
रवींद्र पाटे

नारायणगाव - विघ्नहर मेडिकल फाऊंडेशनचे विषबाधा व सर्पदंश तज्ञ डॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत या दाम्पत्याने विकसित केलेला शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्प दिशादर्शक आहे. सर्पदंशामुळे राज्यात होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्पदंशाची नोंद अधिसूचित आजाराच्या यादीत समावेश करण्यासाठी, जीआर मध्ये बदल करुन सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास दोन लाख रुपयांची मदत देण्यासाठी, सर्पदंशावरील लस खाजगी रुग्णालयात उपलब्ध करून देण्यासाठी, सर्पदंश उपचार प्रशिक्षण व संशोधन केंद्र (ट्रेनिंग सेंटर) जुन्नर येथे सुरू करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. यासाठी डॉ. राऊत यांची मदत घेतली जाईल.असे आश्वासन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले.

डॉ. सदानंद राऊत यांनी विकसित केलेल्या सर्पदंशावरील मिशन इम्पोस्सीबल माहितीपटाचे प्रकाशन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते व गृहमंत्री गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील सहयाद्री अतितिथी गृहात झाले. यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार बाळासाहेब दांगट, आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास, प्रधान सचिव डॉ. एम. एन. केरकेट्टा, आय. एम. ए. चे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, आयसिएमआर. चे संचालक डॉ. गीतांजली सचदेवा, डॉ. आर. सी. पटेल, डॉ. प्रियंका कदम, डॉ. संदेश राऊत, डॉ. हनुमंत भोसले, डॉ. तबाजी गोरडे, गुलाबराव नेहरकर, सरपंच योगेश पाटे, अनंतराव चौगुले, देवराम मुंढे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: धरणाच्या पडलेल्या भिंतीच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्षच

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, सर्पदंशा मुळे देशात साठ हजार मृत्यू होतात. विषारी सर्पदंशावरिल उपचारात शासकीय यंत्रणा कमी पडत आहे. राज्यातील तीन जिल्ह्यातील तेरा तालुक्यात डॉ. राऊत यांनी राबविलेल्या शून्य सर्पदंश मृत्यू प्रकल्पाची नोंद जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) व राष्ट्रीय आयुर्विज्ञान अणुसंधान परिषद (ICMR) यांनी घेतली आहे. मिशन इम्पोस्सीबल माहितीपटामुळे सर्पदंशाच्या गंभीर परिणामा बाबत माहिती मिळाली असून या मुळे सर्पदंशाबाबतच्या अंधश्रद्धा दूर होतील व वेळेत उपचारासाठी मदत होईल.

डॉ. राऊत यांच्या माध्यमातून सर्पदंशा मुळे राज्यात होणारे मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी ऍकशन प्लॅन तयार केला जाईल. खाजगी व शासकीय रुग्णालयात सर्पदंशामुळे झालेल्या प्रत्येक मृत्यूची अधिकृत नोंद करण्यासाठी कायदेशीर कारवाई केली जाईल. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत बदल करून सर्पदंशावरील उपचारासाठी जास्तीत जास्त मदत केली जाईल.

राजेश टोपे (आरोग्य मंत्री) - शेतीत काम करत असताना सर्पदंश होण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र वनविभागाच्या हद्दीत सर्पदंश झाला तरच दोन लाख रुपयांची मदत देण्याचा हास्यास्पद जीआर आहे. सर्पदंश होण्यासाठी शेतकऱ्यांनी वनविभागात जायचे का? असा प्रश्न उपस्थित करून शासकीय बाबूगिरीच्या जीआर मध्ये बदल करण्याची गरज आहे.

वळसे पाटील म्हणाले गोरगरीब रुग्णांना मदत करण्याची भूमिका डॉ. राऊत यांची आहे. त्यांच्या प्रकल्पाचा उपयोग शासकीय धोरण ठरवण्यासाठी होईल. सर्पदंशाच्या दुर्लक्षित घटनेची आरोग्य विभाग नोंद घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करील. त्याचा लाभ सर्वसामान्यांना उपचारासाठी होईल. प्रास्तविक डॉ.राऊत यांनी केले. आभार डॉ.पल्लवी राऊत यांनी मानले.

loading image
go to top