CA Exam : स्नेहल हिरे सणसवाडीतील पहिली सीए

सीए (सनदी लेखापाल) होण्याची मनीषा मनात बाळगून कुटुंबीयांना आणि आख्ख्या गावाला सीए होऊन दाखविण्याचा सणसवाडीतील पहिला प्रयत्न स्नेहल हिरे हिने यशस्वी करुन दाखविला.
Snehal Hire
Snehal Hiresakal
Updated on

शिक्रापूर - सहजपणे हाताला काम आणि उद्योगनगरीतील नोकरी-व्यवसाय संधी असलेल्या सणसवाडी (ता. शिरूर) येथे करिअरच्या वेगळ्या वाटा निवडण्याची मानसिकता दुर्मिळ आहे. मात्र शाळास्तरावरच सीए (सनदी लेखापाल) होण्याची मनीषा मनात बाळगून कुटुंबीयांना आणि आख्ख्या गावाला सीए होऊन दाखविण्याचा सणसवाडीतील पहिला प्रयत्न स्नेहल हिरे हिने यशस्वी करुन दाखविला. पर्यायाने २५ हजार लोकसंख्येच्या गावाच्या इतिहासात पहिली सीए होण्याचा मानही स्नेहल हिरे हिने पटकावला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com