esakal | रोजगार हमीच्या कामांचे ‘सोशल ऑडिट’
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

रोजगार हमीच्या कामांचे ‘सोशल ऑडिट’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार (National Rural Employment) हमी योजनेतून केलेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण (सोशल ऑडिट) (Social audit) केले जाणार आहे. राज्यातील १०२ तालुक्यांमधील ६ हजार १२० ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रोजगार हमीच्या कामांची या अंतर्गत तपासणी करण्यात येणार आहे. यात पुणे (Pune) जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील ४२० ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, हवेली, पुरंदर आणि शिरूर या सहा तालुक्यातील ग्रामपंचायती आहेत. या ऑडिटचा पहिला टप्पा ७ सप्टेंबर ते ११ आक्टोबर या कालावधीत राबविला जाणार आहे. कोरोनामुळे सध्या ग्रामसभा घेण्यास परवानगी नाही. त्यामुळे या ऑडिटचा अहवाल सध्या तरी मंजुरीसाठी ग्रामसभांपुढे ठेवला जाणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटीचे उपसंचालक आशिष लोपीस यांनी जिल्हा परिषदांना पाठविलेल्या आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा: 'पुणे जिल्ह्यातील ग्रामसभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घ्या'

ग्रामसभा घेण्यास परवानगी मिळाल्यानंतर हा अहवाल मंजुरीसाठी ग्रामसभेत मांडणे बंधनकारक असणार आहे. शिवाय त्यावेळी याबाबतचे तालुकानिहाय जनसुनावणीच्या कार्यक्रमांचेही आयोजन करावे लागणार आहे. परंतु, तत्पूर्वी अहवालातील मुद्यांचे वाचन ग्रामपंचायतींच्या विशेष सभांमध्ये करणे अनिवार्य आहे.

loading image
go to top