

₹25 Lakh Social Gratitude Fund Mobilized by 2,000 Members
Sakal
वेल्हे ( पुणे) : सोशल हंड्रेड फाउंडेशनच्या वतीने सुमारे शंभर (हंड्रेड) विद्यार्थ्यांना यावर्षी २५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. फाउंडेशनच्या सुमारे दोन हजार सदस्यांनी जमा केलेल्या सामाजिक कृतज्ञता निधीतून ही शिष्यवृत्ती रविवार (ता.३०) रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह पुणे येथे प्रदान करण्यात आली आहे. फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमामुळे अनेक गरीब, गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा लाभ होणार असून विविध क्षेत्रात या विद्यार्थ्यांचे करिअर घडण्यास मदत होणार आहे.