सामाजिक न्याय विभागास ८२२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त

स्वाधार योजनेसह शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लागणार
Funds
FundsImages By Sakal
Updated on

पुणे : स्वाधार योजनेसह विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी राज्य सरकारने ८२२ कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागास (Social justice department) वितरित केला आहे. हा निधी लवकरच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होइल. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Social justice department receives Rs 822 crore)

कोरोनाच्या परिस्थितीमुळे सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजनांना निधी उपलब्ध होण्यास दिरंगाई झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. या संदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार आणि समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी निधी मिळण्याबाबत मागणी लावून धरली होती. राज्य सरकारने त्याची दखल घेत निधी उपलब्ध करून दिला आहे.

स्वाधार योजनेसाठी ३० कोटी :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी २०२१-२२ या वर्षात दोनशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना गतवर्षातील दुसऱ्या हप्त्याच्या प्रलंबित रकमेपोटी ३० कोटी खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. समाज कल्याण आयुक्तालयाने विभागीय कार्यालयांना ही रक्कम वितरित केली आहे.

परदेश शिष्यवृत्तीसाठी २० कोटी :

राजर्षी छत्रपती शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेतील विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यासाठी २० कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे विदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी ५८५ कोटी :

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत दहावीनंतर विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, शिक्षण व परीक्षा शुल्क दिले जाते. २०२०-२१ वर्षामध्ये शिष्यवृत्तीसाठी ५८५ कोटी रुपये इतकी तरतूद केली आहे.

मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्कासाठी १८७ कोटी :

खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थामधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती देण्यात येते. २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी २५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यापैकी १८७ कोटींचा निधी आयुक्तालयास प्राप्त झाला आहे.

Funds
आयएनएस शिवाजी येथे विविध कार्यक्रमांना सुरुवात

“मागसवर्गीय विद्यार्थांना शिक्षणात अडचणी निर्माण होऊ नये, यासाठी राज्य सरकारने विशेष पावले उचलली आहेत. या संदर्भात सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. ही प्रलंबित शिष्यवृतीची रक्कम लवकरच विद्यार्थ्याच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे," असे समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com