आयएनएस शिवाजी येथे विविध कार्यक्रमांना सुरुवात
आयएनएस शिवाजी येथे विविध कार्यक्रमांना सुरुवात sakal

आयएनएस शिवाजी येथे विविध कार्यक्रमांना सुरुवात

‘आझादी का अमृत महोत्सव’ हा उपक्रम १५ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.
Published on

पुणे : देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘आजादी का अमृत महोत्सव’ (azadi ka amrit mahotsav festival) कार्यक्रमांची मालिका आयोजित केली आहे. याचाच एक भाग म्हणून लोणावळा (lonavla) येथील आयएनएस शिवाजी येथे सोमवारपासून (ता. ९) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (Ins shivaji start festival freedom day india)

यानिमित्त सोमवारी नौदलाचे जवान व त्यांच्या कुटुंबीयांसाठी व्याख्यान आणि सादरीकरणाचे आयोजन केले होते. यामध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या ‘भारत छोडो चळवळीवर’ विशेष भर देण्यात आला. तसेच ‘आयएनएस शिवाजी’चे प्रमुख कमांडर अरविंद रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारांना छत्रपती शिवाजी महाराज आणि कान्होजी आंग्रे यांची नावे देण्यात आली.

आयएनएस शिवाजी येथे विविध कार्यक्रमांना सुरुवात
आरटीई अंतर्गत प्रवेश घेऊनही विद्यार्थी अद्याप शिक्षणापासून वंचित

‘आझादी का अमृत महोत्सव’ हा उपक्रम १५ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. हा उपक्रम भारताच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय अस्मितेबद्दल माहिती देणारा आहे. या अनुषंगाने संस्थेमार्फत शालेय विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी व ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com