esakal | सोशल मिडीयावर गणपती बाप्पांची अनंत चतुर्थीपर्यंत धूम कायम
sakal

बोलून बातमी शोधा

In Pune this year public Ganeshotsav will celebrated in simple way.jpg

सोशल मिडीयावर गणपती बाप्पांची अनंत चतुर्थीपर्यंत धूम कायम

sakal_logo
By
शब्दांकन : जनार्दन दांडगे

लोणी काळभोर : सर्वांचाच लाडका असणाऱ्या गणपती बाप्पांचे मोठ्या दिमाखात शुक्रवारी (ता. १०) आगमन झाले आहे. शुक्रवारी सकाळपासून सोशल मीडियावर गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. घरातील गणपतीची आरास तसेच गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देणारे मेसेज मित्र - मैत्रिणींना शेअर केले जात आहेत.

मित्रपरिवार, नातेवाईक यांना भेटणे शक्य नसल्याने व्हॉट्सअॅप, फेसबुक, इंस्टाग्राम, मेसेंजर यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. तसेच नेटकऱ्यांनी श्री गणेशाचे फोटो एकमेकांना फॉरवर्ड केले जात आहेत. वेगवेगळे व्हिडिओ, स्टिकर्स, आरती संग्रह यामुळे सोशल मीडिया बाप्पामय झाला असल्याचे चित्र सध्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दिसून येत आहे.

गणेशोत्सवाला शुक्रवारपासून सर्वत्र प्रारंभ झाला. यंदा या उत्सवात कुठेही जल्लोष अथवा ढोल ताशांचा निनाद दिसला नाही. कोरोनामुळे या वर्षीही गणेशोत्सवावर परिणाम झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर गणेशोत्सवाची धूम दिसत आहे. नेटकऱ्यांनी कित्येक दिवस अगोदरपासून बाप्पांचे मॅसेज व फोटो फॉरवर्ड करीत आहेत. वेगवेगळे व्हिडीओज, आरती संग्रह याद्वारे सोशल मीडिया बाप्पामय झाला आहे.

हेही वाचा: चंद्रकांत पाटील अफवा पसरवतात, त्या वक्तव्याचा राऊतांनी घेतला समाचार

कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व घरोघरीही बाप्पांची अत्यंत साधेपणाने प्रतिष्ठापना झाली आहे. दरवर्षी दिसणारा आरत्यांचा गजर अन् भक्तीचा जागर सध्या साध्या पद्धतीने पहायला मिळत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत असला तरी भक्तांचा उत्साह मात्र कायम आहे. अनंत चतुर्थीपर्यंत सोशल मीडियावर गणेश उत्सवाची धूम कायम राहणार आहे.

हेही वाचा: Pune Live Update - कुठे गर्दी, कशी सुरु आहे वाहतूक?

दरम्यान, गणेश भक्तीचा उत्साह मोबाईलमधून ओसांडून वाहत आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे तसेच प्रशासनाच्या नियम, अटी व शर्तीमुळे लोणी काळभोर व उरुळी कांचन परिसरात घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळे गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना दिसून येत आहे.

loading image
go to top