esakal | Pune। बिबवेवाडीतील सोसायटी करणार पाच लाख युनीट वीज निर्मिती
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे: बिबवेवाडीतील सोसायटी करणार पाच लाख युनीट वीज निर्मिती

पुणे: बिबवेवाडीतील सोसायटी करणार पाच लाख युनीट वीज निर्मिती

sakal_logo
By
नितीन बिबवे

बिबवेवाडी: मागील वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळात गंगाधाम परिसरातील वर्धमानपूरा सोसायटीतील तरुणांना सुचलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाला काही महिन्यांनी मूर्तरूप येत वार्षिक पाच लाख युनीटपर्यंत वीज निर्मिती करणारा 230 किलोवॅटचा सौरऊर्जा प्रकल्प तयार करण्यात आला.

प्रकल्पाचे आमदार माधुरी मिसाळ व आमदार सुनील कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी नगरसेवक प्रवीण चोरबेले, राजेंद्र शिळीमकर, मानसी देशपांडे, अनुसया चव्हाण,मनोज देशपांडे, दीपक मुनोत, अध्यक्ष संजय शिंगवी, सचिव महावीर मांडोत, खजिनदार अमित मुनोत, भाजपा अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष महेंद्र सुंदेचा व सोसायटी चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

हेही वाचा: शौर्यदिन : जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार

वर्धमानपूरा सोसायटीत 330 सदनिका असून दोन हजार नागरिक राहतात, सोसायटीने विजेच्या बचतीसाठी गरम पाण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प तयार केले होते परंतु मागील वर्षी कोरोना महामारीमूळे लॉक डाउनच्या दरम्यान सोसायटीतील तरुण अमित मुनोत, महावीर मांडोत, अजय बोरा, माणिकचंद बखोरीय, विजय ठक्कर, धर्मेश तानटी, कुशल मेडतीया, प्रवीण बाफना, नितीन नहार, महेंद्र सुंदेचा व होम ग्रीन एनर्जी सोल्युशन एकत्र येत सौरऊर्जा प्रकल्पाची कल्पना मांडली त्याला सोसायटीतील सभासद व पदाधिकाऱ्यांनी प्रोत्साहन देत प्रकल्प पूर्ण केला त्यामुळे सोसायटीचे दरमहा येणाऱ्या लाखो रुपयांच्या विजेच्या बिलाची बचत होत सोसायटी महावितरणला वीज पुरवठा करणार आहे.

वार्षिक पाच लाख युनीट वीज निर्मितीसाठी दहा हजार झाडांची कत्तल झाली असती त्यामुळे अडिच ते तीन लाख किलो कार्बनडायॉक्साईड तयार होऊन निसर्ग व मानवी जीवनाला त्रास झाला असता असे मत सोसायटीच्या वतीने अध्यक्ष संजय शिंगवी यांनी व्यक्त केले.

भविष्यात सौरऊर्जेची मोठ्या प्रमाणात गरज असून केंद्र सरकार त्यानुसार विविध योजना राबवीत आहेत, सोसायट्यांनी असे प्रकल्प राबवून नवीन आदर्श निर्माण केला आहे त्याचे इतर सोसायट्यांनी मार्गदर्शन घ्यावे असे मत आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले. शहरातील एव्हड्या मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करणारी पहली सोसायटी, त्यामुळे कॉमनचे लाइटबिल शून्य, सोसायटीला विजेच्या माध्यमातून उत्पन्न सुरू, मेंटेनन्स वाचून सोसायटीची पत वाढते.

loading image
go to top