शौर्यदिन : जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते माजी सैनिकांचा सत्कार

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 30 September 2020

यावेळी मेजर बिक्रमसिंग थापा, निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ. सचिन खल्लाळ, माजी सैनिक संघटना अध्यक्ष सार्जेन्ट रामराव थडके, सुभेदार हिंगोले मारोती, मा. सैनिक कर्मचारी विभागीय अध्यक्ष पठाण व विविध ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले माजी सैनिक उपस्थित होते. 

नांदेड  : शौर्यदिनाचे औचित्य साधुन “ बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नी यांना मालमत्ता कर माफी योजना”  प्रमाणपत्र वाटपाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. यावेळी  जिल्हातील  विरनारी, विरपिता- विरमाता व माजी सैनिकांचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या हस्ते करण्यात आला. कोविड- 19 प्रादुर्भाव सुचनाचे पालन करीत हा कार्यक्रम साधेपणाने संपन्न झाला.

यावेळी मेजर बिक्रमसिंग थापा, निवासी उपजिल्हाधिकारी  डॉ. सचिन खल्लाळ, माजी सैनिक संघटना अध्यक्ष सार्जेन्ट रामराव थडके, सुभेदार हिंगोले मारोती, मा. सैनिक कर्मचारी विभागीय अध्यक्ष ह्युमाईन पठाण व विविध ऑपरेशनमध्ये सहभागी झालेले माजी सैनिक उपस्थित होते. 

प्रशिक्षण कालावधीत सैन्याच्या विविध ठिकाणी  सिमेवर भेटी

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी या दिनानिमित्त सर्व माजी सैनिकांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी या प्रशिक्षण कालावधीत सैन्याच्या विविध ठिकाणी  सिमेवर भेटी दिल्याचे व सैन्यसेवेचा अनुभव घेतल्याचे नमुद करीत सैनिकांचे जीवन खडतर असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या अडी- अडचणी सोडविण्यासाठी येत्या 12 ऑक्टोंबर रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात येत असल्याबाबत यावेळी त्यांनी सांगितले.

जम्मु- कश्मीर, उरी येथे  झालेल्या अतिरेक्याचा भ्याड हल्याचा बदला

प्रास्ताविकात कल्याण संघटक सुभेदार कमलाकर शेटे यांनी शौर्यदिनाचे महत्व सांगून भारतीय सैन्यदलाने 29 सप्टेंबर 2016 रोजी  पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जीकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्याचा खात्मा केला होता. ही कार्यवाही  जम्मु- कश्मीर, उरी येथे  झालेल्या अतिरेक्याचा भ्याड हल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आली होती.  यानिमित्त 29 सप्टेंबर हा दिवस शौर्यदिन म्हणुन साजरा करण्यात येतो असेही त्यांनी नमुद केले. या सर्जीकल स्ट्राईकमध्ये  जिल्ह्यातील माजी सैनिक पॅरा कमांडोज होते. त्यांचाही  विशेष सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. प्रदिर्घ सैन्य सेवा केलेले ऑन कॅप्टन किशन कपाळे, ऑन कॅप्टन प्रकाश कस्तुरे, ऑन कॅप्टन संजय कदम यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी  सुभेदार काशिनाथ ससाने, मा. सै. शिसोदे, श्रीमती वर्षा सापणर, सुर्यकांत कदम, सुरेश टिपरसे यांनी परिश्रम केले.                                                                                               

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collector Dr. Ex-servicemen felicitated by Vipin nanded news