सोसायट्यांनी घरेलू कामगारांना प्रवेशबंदी थांबवावी; अन्यथा....

सोसायट्यांनी घरेलू कामगारांना प्रवेशबंदी थांबवावी; अन्यथा....

पुणे : सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना जशी त्यांच्या जीवाची काळजी तशीच घरेलू कामगारांनाही आहेच. पुरेशी काळजी आणि खबरदारी घेऊन त्यांना कामावर येऊ द्या. सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी हट्टीपणा करून गरीबांच्या आर्थिक मुळावर येऊ नका, असे आवाहन पुणे शहर मोलकरीण संघटनेने केले आहे. सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांची दादागिरी सुरू राहिली तर, कामगार आयुक्त, निबंधक कार्यालयांकडे संघटना तक्रार करेल, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे. 

राज्य सरकार तसेच महापालिकेने घरेलू कामगारांना (मोलकरीण, ड्रायव्हर, गाड्या धुणारे कामगार, बागकाम करणारे मजूर) कामावर जाण्यास कोणताही प्रतिबंध केलेला नाही. महापालिकेने घरेलू कामगारांबाबत दोन जून रोजी आदेश काढून पुरेशी काळजी आणि घबरदारी घेऊन त्यांना कामावर जाता येईल, असे स्पष्ट केले आहे. तरीही अनेक मोठ्या सोसायट्यांनी घरेलू कामगारांना सोसायट्यांची प्रवेशद्वारे बंद केली आहेत. मात्र, उपनगरांतील अनेक सोसायट्यांनी घरेलू कामगारांना प्रवेश दिला आहे. त्यासाठी नियमही केले आहेत. शहर आणि परिसरात सुमारे दोन लाख घरेलू कामगार आहेत.  काम नसल्यामुळे अनेक घरेलू कामगार अडचणीत सापडले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या पार्श्वभूमीवर संघटनेच्या सरचिटणीस मेधा थत्ते म्हणाल्या, सोसायट्यांमध्ये राहणाऱया नागरिकांना जशी त्यांच्या आरोग्याची काळजी आहे, तशीच घरेलू कामगारांनाही आहे. कामावर येताना त्यांच्या शारिरीक तापमानाची नोंद घेण्यासाठी थर्मोमीटर आहे. त्याद्वारे चाचणी करता येते. तसेच घरोघरी सॅनिटायझर आहे. घरमालक आणि कामगार हे दोन्ही घटक परस्पर संमतीने काम करण्यास तयार असतील तर, सोसायट्यांनी आडकाठी करायचे कारण काय, सोसायट्यांच्या पदाधिकारयांनी या बाबत विचार केला पाहिजे. घऱेलू कामगारांना एप्रिल, मे महिन्याचा पगार त्या काम करीत असलेल्या ठिकाणच्या लोकांनी द्यायला पाहिजे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काम मिळणे, ही जशी घरेलू कामगारांची गरज आहे, तसेच त्यांनी कामावर येणे ही सोसायट्यांमध्ये राहणाऱया महिलांचीही गरज आहे. त्यांना त्यांची ड्यूटी सांभाळून घरकाम करणे अवघड होत आहे. तसेच अनेक सोसायट्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांनाही घरकामासाठी घरेलू कामगारांची गरज आहे. त्यामुळे दोन्ही घटकांना परस्परांची गरज आहे, याची नोंद सोसायट्यांच्या पदाधिकाऱयांनी घ्यायला पाहिजे, असेही थत्ते यांनी स्पष्ट केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकार, महापालिका यांच्या नियमांचे पालन करण्यास घरेलू कामगार तयार आहेत. त्यांनाही त्यांच्या आरोग्याची काळजी आहे. त्यामुळे नियमांचे पालन करून त्यांना काम करू देण्यास सोसायट्यांनी मोकळीक द्यावी आणि गरीब, कष्टकरी वर्गाप्रती सामाजिक जबाबदारीचे पालन करावे, असे आवाहन थत्ते यांनी केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माणुसकीची अनेक उदाहरणे 

महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी गेले दोन महिने त्यांच्याकडे दोन घरेलू कामगार येत नाहीत. तरीही दर महिन्याच्या एक तारखेला ते त्या कामगारांना पगार देत आहेत. शहरातील अनेक कुटुंबांनी या पद्धतीने घरेलू कामगारांना सहकार्य केले आहे. आता सोसायट्यांचे पदाधिकारी हा घरेलू कामगारांना अडथळा ठरत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com