अभय योजनेस गाळेधारकांचा अत्यल्प प्रतिसाद.

अभय योजनेस गाळेधारकांचा अत्यल्प प्रतिसाद.
Published on

‘अभय’ योजनेस गाळेधारकांचा अत्यल्प प्रतिसाद
एका महिन्यात केवळ १ कोटी ८२ लाखांची वसुली; ३७ लाखांचा दंड माफ

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ७ : सोलापुरातील मिनी तसेच मेजर गाळेधारकांसाठी महापालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेस अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत एका महिन्यात केवळ १ कोटी ८२ लाखांची थकबाकी वसुली झाली.
महापालिकेने ६ ते ३१ जुलै या कालावधीत मेजर व मिनी गाळेधारकांसह अन्य लोकांसाठी अभय योजना जाहीर केली होती. याअंतर्गत थकबाकीवरील दंडाची १०० टक्के माफी देऊन सप्टेंबर २०२६ पर्यंत संपूर्ण थकीत भाडे वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. थकबाकी न भरणाऱ्या गाळेधारकांचे गाळे सील करण्यासाठी वसुली पथकेही स्थापन करण्यात आली होती.
दरम्यान, या योजनेस २४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. गाळेधारकांकडे मागील थकबाकी १५ कोटी ८९ लाख, तर चालू थकबाकी ९ कोटी ७५ लाख आहे. त्यामुळे अभय योजनेंतर्गत चांगली वसुली अपेक्षित होती. मात्र, या योजनेस कमी प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना एसआयआरची ड्यूटी लागल्याने वसुलीवर परिणाम झाला. दुसरीकडे, गाळेधारकांनीही अभय योजना गांभीर्याने घेतली नाही.
एकूण २५ कोटी ६४ लाखांच्या थकबाकीपैकी एका महिन्यात केवळ १ कोटी ८२ लाखां रुपयां वसुली झाली. या योजनेअंतर्गत महापालिकेने ३७ लाखांचा दंड माफ केला आहे.
“अद्याप वेळ गेलेली नाही. गाळेधारकांनी अभय योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन पालिकेस सहकार्य करावे. ही संधी पुन्हा मिळणार नाही. थकबाकी तशीच राहिल्यास ती पुन्हा वाढू शकते. त्यामुळे अभय योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त थकबाकी भरावी,” असे आवाहन महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त विणा पवार यांनी केले आहे.

चौकट..
आकडे बोलतात
- एकूण थकबाकी : २५ कोटी
- अभय योजना वसुली : १ कोटी ८२ लाख
- दंड माफ : ३७ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com