

Solapur Sortapwadi Accident Young Girl Dies After Tempo Runs Over Her Driver Booked in Culpable Homicide Case
sakal
उरुळी कांचन : पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी फाटा (ता. हवेली) येथील ओंकार रोज नर्सरीमध्ये टेम्पो मागे घेताना झालेल्या अपघातात दीड वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवल्याबद्दल टेम्पो चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.