

दुचाकींची समोरासमोर
धडक, तरुण जखमी
सोलापूर ः दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला. शुक्रवारी (ता. ६) दुपारी सव्वादोनच्या सुमारास मेडशिंगी-सांगोला रस्त्यावर वाढेगावनजीक हा अपघात घडला. गौरव मोहन माडकर (वय २०, रा. भाटेवाडी, ता. उत्तर सोलापूर) असे जखमीचे नाव आहे. गौरव हा मेडशिंगी येथून दुचाकीवरून सांगोल्याकडे निघाला होता. वाढेगावजवळ समोरून आलेल्या दुचाकीशी धडक झाल्याने हा अपघात घडला. यात डोक्याला, चेहऱ्याला व पायाला मार लागून तो जखमी झाला. त्याच्यावर सांगोल्यातील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
मोहोळमध्ये अपघात,
एकजण जखमी
सोलापूर ः दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एकजण जखमी झाला. शुक्रवारी (ता. ६) रात्री अकराच्या सुमारास मोहोळ येथील पुलावर हा अपघात घडला. पांडुरंग पोपट चव्हाण (वय ४३, रा. वाफळे, ता. मोहोळ) असे जखमीचे नाव आहे. ते मोहोळमधून दुचाकीवरून गावी वाफळेकडे निघाले होते. मोहोळमधील पुलावर दुचाकी घसरून हा अपघात घडला. यात चेहऱ्याला, कानाला व बरगडीला मार लागून ते जखमी झाले. तेथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
रस्त्याकडेला झोपलेल्या
एकाच्या पायावरून गेला ट्रक
सोलापूर ः रस्त्याकडेला झोपलेल्या एकाच्या पायावरून ट्रक गेल्याने तो जखमी झाला. तीन नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास हिसरे (ता. करमाळा) शिवारात हा अपघात घडला. नागेश विनायक राठोड (वय ३०, रा. जानुर, ता. जि. लातूर, सध्या रा. हिसरे) असे जखमीचे नाव आहे. करमाळा रस्त्यावरील एका शेतकऱ्याकडे तो कामाला आहे. तो शेताजवळ रस्त्याकडेला झोपला होता. ट्रक दोन्ही पायांवरून गेल्याने तो जखमी झाला. त्याच्यावर करमाळ्यातील कुटीर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला येथील शासकीय रुग्णालयात हलविले आहे. याची सिव्हिल पोलिस चौकीत नोंद झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.