जिल्हा क्रीडा संकुलाचा ‘हायटेक’कडे प्रवास

जिल्हा क्रीडा संकुलाचा ‘हायटेक’कडे प्रवास
Published on

फोटोओळ PNE26W42996 :
सोलापूर : जिल्हा क्रीडा संकुलाच्या बाजूचे अतिक्रमण हटवून नवीन संरक्षक भिंतीचे सुरू असलेले बांधकाम.

फोटोओळ PNE26W42998 :
सोलापूर : जिल्हा क्रीडा संकुलात धावपटूंसाठी सुरू असलेले रनिंग ट्रॅकचे काम.

जिल्हा क्रीडा संकुलाचा ‘हायटेक’कडे प्रवास
सिंथेटिक ट्रॅकसह विविध खेळांच्या सुविधा; संकुल ‘बीओटी’वर देऊ नये, नगरसेवकांची मागणी

तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १७ : कुमठा नाका येथील जिल्हा क्रीडा संकुलात ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक, बॅडमिंटनसाठी इनडोअर हॉलसह विविध कामे सुरू आहेत. पुढील वर्षी धावपटू, फुटबॉलपटू, बॅडमिंटन व लॉन टेनिसच्या खेळाडूंसाठी मोठ्या स्पर्धा घेण्याच्या दृष्टीने संकुलाचा विकास करण्यात येत आहे. येथे सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल, बॅडमिंटन, लॉन टेनिस, आर्चरी व स्केटिंगसाठी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
चार हुतात्मा पुतळ्याजवळील भारतरत्न इंदिरा गांधी पार्क स्टेडियमनंतर कुमठा नाका परिसरातील जिल्हा क्रीडा संकुल हे मोठे मैदान आहे. पार्क स्टेडियम ‘बीओटी’ तत्त्वावर दुसऱ्या संस्थेला देण्यात येणार आहे. मात्र, गोरगरिबांच्या मुलांसाठी असलेले जिल्हा क्रीडा संकुल भाडेतत्त्वावर देऊ नये. त्याची निगा, देखभाल व दुरुस्ती शासकीय यंत्रणेमार्फतच करावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली आहे.
सिंथेटिक ट्रॅकवर धावणे, लाँग जंप, हाय जंप व ट्रिपल जंपच्या स्पर्धा घेता येणार आहेत. ट्रॅकच्या मध्यभागी गवत लावून फुटबॉलसाठी मैदान तयार केले जाणार आहे. स्पर्धांसाठी येणाऱ्या खेळाडूंच्या निवासासाठी संकुलाजवळ १५० मुला-मुलींची क्षमता असलेल्या वसतिगृहाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी आमदार देवेंद्र कोठे यांनीही संकुलाला भेट दिली होती.

सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर येथे सात ते आठ क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना सुविधा मिळणार आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत मोहरे व मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय वरकड यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे सुरू आहेत.
-----------------------
PNE26W43000
पार्क स्टेडियम ‘बीओटी’वर दिल्याने पैसे दिल्याशिवाय तेथे खेळता किंवा सराव करता येत नाही. जिल्हा क्रीडा संकुलही अशा पद्धतीने देऊ नये. गोरगरिबांच्या मुलांना विविध स्पर्धांची तयारी मोफत करता यावी, अशा सुविधा द्याव्यात.
- शिवानंद पाटील, नगरसेवक
-----------------------
PNE26W43001
जिल्हा क्रीडा संकुलाजवळ कुष्ठरोग वसाहतीतील कचरा डेपोच्या लगत कबड्डीचे मोठे मैदान आहे. माधवनगर झोपडपट्टी परिसरात खो-खोचे चांगले मैदान आहे. या दोन्ही मैदानांचा विकास झाल्यास राज्य व देशात गाजणारे खेळाडू सोलापुरातून तयार होतील.
- प्रशांत पल्ली, नगरसेवक

प्रभाग क्रमांक १८ मधील समस्यांसाठी विठ्ठल सुतार (९७६६११३८५५) यांच्याशी संपर्क करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com