प्रभाग 5

प्रभाग 5

Published on

SLC26B27894
सोलापूर : प्रभाग पाचमधील भाजपचे विजयी उमेदवार समाधान आवळे, बिज्जू प्रधाने, अलका भवर व मंदाकिनी तोडकरी.
---
प्रभाग ५ मध्ये परिवर्तनाचा झंझावात
३ टर्मचे नगरसेवक आनंद चंदनशिवेंचा पराभव; भाजपचे संपूर्ण पॅनेल विजयी
सकाळ वृत्तसेवा
​सोलापूर, ता. १६ : महापालिका निवडणुकीच्या निकालात प्रभाग ५ मध्ये राजकीय भूकंपाची स्थिती पाहायला मिळाली. प्रस्थापित नेतृत्वाचा करिष्मा मोडीत काढत मतदारांनी नव्या चेहऱ्यांच्या हाती सत्तेची चावी दिली आहे. या प्रभागात भाजपने शिस्तबद्ध यंत्रणेच्या जोरावर आपले संपूर्ण पॅनेल निवडून आणत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.
​​या निवडणुकीतील सर्वात अनपेक्षित निकाल प्रभाग ५ (अ) मध्ये लागला. गेल्या १५ वर्षांपासून (३ टर्म) सलग नगरसेवक राहिलेले आणि सभागृहात गटनेते म्हणून दबदबा निर्माण करणारे दिग्गज नेते आनंद चंदनशिवे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे समाधान आवळे यांनी ३ हजार २३१ मतांच्या मोठ्या फरकाने चंदनशिवे यांचा पराभव करत ‘जायंट किलर’ ठरण्याचा बहुमान मिळवला.
---
​बिज्जू प्रधाने : ३० वर्षांच्या तपश्चर्येला विजयाची पावती
​प्रभाग ५ (ड) मध्ये भाजपचे बिज्जू प्रधाने यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. तब्बल ३० वर्षांच्या राजकीय प्रतीक्षेनंतर त्यांना विजयाने हुलकावणी दिली नाही. त्यांनी भाजपचेच बंडखोर उमेदवार राजू आलुरे यांचे कडवे आव्हान ८३५ मतांनी मोडीत काढले. पक्षनिष्ठेला मतदारांनी दिलेली ही मोठी पावती मानली जात आहे. ​प्रभागातील महिला राखीव जागांवरही परिवर्तनाची लाट स्पष्टपणे दिसून आली.
​प्रभाग ५ (ब) मधील अलका भवर यांनी ३ हजार ५११ मतांचे मोठे मताधिक्य घेत भाग्यश्री काळे यांचा पराभव केला.
​प्रभाग ५ (क) मधील मंदाकिनी तोडकरी यांनी अपक्ष उमेदवार सरस्वती सुरवसे यांना ५ हजार ०७८ मतांच्या विक्रमी फरकाने धूळ चारली.

५ अ - समाधान आवळे - ८०७०
५ ब - अलका आनंद भवर - ७१८३
५ क - मंदाकिनी तोडकरी - ७८९१
५ ड - बिज्जू प्रधाने - ६२०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com