Pune Rain : पावसामुळे फुलांचे मोठे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Rain Crop Damage

Pune Rain : पावसामुळे फुलांचे मोठे नुकसान

माळशिरस : सततच्या पावसामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून फूल उत्पादकांचा दिवाळी हंगाम वाया गेला आहे, पावसामुळे भिजलेली शेवंती फुले पुणे येथील फुल बाजारात अंत्यत कमी वीस, तीस रूपये किलो एवढ्या कमी किंमती मध्ये विकली गेली तर मोठ्या प्रमाणावर शेवंतीची भिजलेली फुले ऐन दिवाळीमध्ये मागणी अभावी तशीच पडून होती.

फुल उत्पादकांसाठी दसऱ्यानंतर दिवाळी हा महत्त्वाचा हंगाम असतो, या वर्षी दसरा मध्ये शेवंती वर्गीय फुलांना दोनशे ते अडीचशे रुपये किलोपर्यंत बाजारभाव मिळाले होते, यामुळे दिवाळीमध्ये देखील फुलांना चांगल्या प्रकारचे असेच बाजार भाव मिळतील अशी फूल उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षा होती.

मात्र मागील आठ दिवसा मोठ्या प्रमाणावर ती दररोज पाऊस होत असल्याने फुलांचे अत्यंत नुकसान झाले आहे, पावसामुळे फुले काळी पडली आहे, अशी फुले विक्री करता आणलयावर खराब होत असल्याने बाजारात या फुलांना मागणी नाही, पुणे येथील फूल बाजारात नेहमी प्रमाणे यावर्षी देखील बाहेरील जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर फुले खरेदी करण्यासाठी व्यापारी बाजारात आलेले आहेत.

मात्र अशा प्रकारे पावसाने भिजलेली फुले खरेदी करून बाहेर पाठवायचे झाल्यास जाईपर्यंत ती खराब होत असल्याने बाजारात व्यापारी असून देखील माल अपेक्षित प्रमाणात खरेदी करत नसल्याने आज पुणे येथील गुलटेकडी फुल बाजारात भिजलेली कापरी,झेंडू, बिजली वीस तीस रूपये दराने विकली गेली, शेवंतीची फुले देखील वीस तीस रूपये किलो दराने विकली गेली.

ओली नसलेली शेवंतीची फुले शंभर ते सव्वाशे रुपये किलोपर्यंत विकली जात असताना पावसामुळे भिजलेली फुले अशा नाममात्र दराने विकावी लागत असल्याने फुल उत्पादक पोपट वाघले,जर्नादन वाघले, रामदास वाघले, तुळशीराम वाघले, शामराव वाघले या शेतकऱ्यांनी फुलांवर वर्षभरातील आखलेली शेतीचे बजेट पुर्णतः कोलमडले असून शासनाने फुल उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले,

पाऊस नसता तर शेवंती दोनशे रुपये किलोपर्यंत विकली असती

या बाबत फुल आडतदार मोहण शेठ कुंजीर यांनी सांगितले की, या वर्षी फुलांच्या लागवडी कमी असल्याने दिवाळीच्या हंगामात पाऊस नसता तर शेवंती दोनशे रुपये किलोपर्यंत सहज विकली गेली असते, फुल उत्पादक व त्या संबंधित सर्व घटकांचे यामुळे नुकसान झाले आहे.