

Joint Demolition Drive by Highway and PMC Departments
Sakal
हडपसर : येथील हडपसर-मुंढवा क्षेत्रिय कार्यालय हद्दीत राष्ट्रीय महामार्ग विभाग, पालिकेचा बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सोलापूर महामार्गासह मांजरी फाटा चौकातील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन हजार चौरस फूट आरसीसी बांधकामासह ७ हजार ८०० चौरस फूटाचे शेड जमीनदोस्त करण्यात आले. आज सकाळी साडेदहा ते दुपारी चार वाजेपर्यंत ही कारवाई झाली. सोलापूर महामार्ग व १५ नंबर बस स्थानक येथे रस्ता रुंदीकरण, फ्रंट तसेच साइड मार्जिन व सात स्टॉलवर कारवाई करण्यात आली. याशिवाय एक हातगाडी, सिलेंडर, चार काउंटर, दहा पथारी तर अकरा इतर वस्तू या कारवाईत जप्त करण्यात आल्या.