प्रशिक्षणार्थी विमान सोलापूरात धावपट्टीवर आदळले

प्रशिक्षणार्थी विमान सोलापूरात धावपट्टीवर आदळले
Published on: 

पुणे, ता. १२ : बारामतीहून उड्डाण केलेल्या ‘रेड बर्ड फ्लाईट ट्रेनिंग ॲकॅडमी’च्या प्रशिक्षणार्थी विमान गुरुवारी दुपारी सोलापूर विमानतळावर उतरताना आदळले. विमानाचा वेग सुमारे १०० ते ११० किलोमीटर असल्याने पुढील चाकाचे मोठे नुकसान झाले. या घटनेत महिला प्रशिक्षणार्थी वैमानिक थोडक्यात बचावली. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) चौकशीचे आदेश दिले असून शुक्रवारी (ता. १३) पथक सोलापुरात दाखल होणार आहे.

‘टेक्नाम पी-मेंटॉर’ या दोन आसनी आणि सिंगल इंजिन विमानाने गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास बारामतीहून उड्डाण केले. या विमानात एक महिला प्रशिक्षणार्थी वैमानिक होती. दुपारी दोनच्या सुमारास सोलापूर विमानतळावर उतरताना विमान धावपट्टीवर जोरात आदळल्याने पुढील टायर फुटले आणि चाक दुमडले गेले. त्यामुळे विमानाचा पुढचा भाग थेट धावपट्टीवर घासला गेला आणि विमान धावपट्टीच्या मधोमध अडकून पडले. या घटनेला रेड बर्ड ॲकॅडमीच्या प्रवक्त्यांनी दुजोरा दिला आहे. हे विमान नवीन असून २०२५ मध्येच ॲकॅडमीच्या ताफ्यात दाखल झाले आहे.

‘डीजीसीए’ करणार तपासणी
‘डीजीसीए’ने या अपघाताची दखल घेतली असून शुक्रवारी (ता. १३) एक पथक सोलापूर विमानतळावर दाखल होणार आहे. ‘डीजीसीए’चे पथक विमानाची पाहणी करून हिरवा कंदील देत नाही, तोपर्यंत विमान धावपट्टीवरून हटवता येणार नाही. हे विमान धावपट्टीवरून खाली घसरले नसल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.